Kalewadi : पवना नदीमध्ये राडारोडा टाकल्या प्रकरणी महिलेसह चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पवना नदी मध्ये राडारोडा टाकल्याप्रकरणी (Kalewadi) महिलेसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सारा प्रकार 23 मार्च ते 27 मार्च 2024 या कालावधीमध्ये रहाटणी, काळेवाडी येथे घडला आहे.

याप्रकरणी अमोल गणपत गोरखे (वय 47 रा.आकुर्डी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे., यावरून महिला आरोपी, संभाजी निवृत्ती नढे (वय 64 रा. काळेवाडी), तुकाराम दामोदर नढे (वय 55) व गणेश ज्ञानेश्वर नढे (वय 35) सर्व रा. काळावेडी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Pimpri: जगद्‌गुरु संत तुकाराम महाराजांच्या 375व्या वैकुंठगमन सोहळ्यानिमित संतपीठात विविध कार्यक्रमांचे आयोजन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी गट नंबर 96 रहाटणी (Kalewadi) काळेवाडी येथील पवना नदीपात्रामध्ये कोणत्याही परवानगी शिवाय बांधकामाचा राडारोडा टाकून नदी प्रदुषण करून आदेशाचा अवमान केला आहे. यावरून आरोपींवर पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 कलम 3, 15 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकारणाचा गुन्हा पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.