Pimpri: जगद्‌गुरु संत तुकाराम महाराजांच्या 375व्या वैकुंठगमन सोहळ्यानिमित संतपीठात विविध कार्यक्रमांचे आयोजन

एमपीसी न्यूज – जगद्‌गुरु संत तुकाराम महाराजांच्या  375व्या वैकुंठगमन सोहळ्याचे औचित्य साधून (Pimpri)जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ स्कुल अॅन्ड ज्यु. कॉलेज मधील सर्व विद‌यार्थी, पालक व पंचक्रोशीतील ग्रामस्थांना जगद्‌गुरु संत तुकाराम महाराजांच्या जीवन चरित्राचा श्रवणानंद मिळावा या पवित्र हेतूने संत, तुकाराम महाराजांचे चरित्र, तसेच त्यांच्या जीवनावरील प्रसंगानुरूप व्याख्याने व अभंगवाणी इ. कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

सदर कार्यक्रमासाठी मा. शेखर सिंह (भा.प्र.से) (Pimpri)(आयुक्त तथा प्रशासक पिं.चिं. मनपा, अध्यक्ष संतपीठ), डॉ. सदानंद मोरे(अध्यक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य वसंस्कृती मंडळ) मा. विनय कुमार चौबे (पोलिस आयुक्त पिंपरी चिंचवड महाराष्ट्र) ह.भ.प. माणिक शास्त्री मुखेकर (अध्यापक वारकरी शिक्षण संस्था आळंदी) ह.भ.प पुरुषोत्तम महाराज मोरे (अध्यक्ष जगद्‌गुरु संत तुकाराम महाराज संस्थान देहू), मा. प्रदीप जांभळे पाटील (अतिरिक्त आयुक पिं चि. मनपा), मा विजयकुमार थोरात (सहाय्यक आयुक्त तथा सी.ई.ओ. संतपीठ) हे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

 

 

Pune : वै. डॉ. रामचंद्र देखणे स्मृती कीर्तन-लोककला सेवा पुरस्कारांची घोषणा

सदर कार्यक्रम दिनांक 1 एप्रिल ते 8 एप्रिल या कालावधीत होणार असून त्यापैकी दिनांक १ एप्रिल ते 5 एप्रिल 2024 पर्यंत संत साहित्याचे अभ्यासक विद्यावाचस्पती ह.भ.प. डॉ रविदास महाराज शिरसाठ यांच्या वाणीतून जगद्‌गुरु संत तुकाराम महाराजांचे संपूर्ण चरित्र प्रतिपादन केले केले जाणार आहे. दिनांक 6 एप्रिल 2024 रोजी संचालक जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ ह.भ.प. डॉ. सदानंद मोरे तुकाराम दर्शन या विषयावर व्याख्यान देणार आहेत.

 

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मा. डॉ. अभयजी टिळक (विश्वस्त संतज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी) हे करणार आहेत. रविवार दिनांक 7 एप्रिल2024 रोजी अभ्यासक, जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ महंत ह.भ.पप्रमोद महाराज जगताप "तुका विष्णू नोहे दूजा" या विषयावर व्याख्यान देणारआहे. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक जगद्‌गुरु संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज ह.भ.प. पुंडलिक महाराज देहूकर करणार आहेत. सोमवार दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी पं. शौनक अभिषेकी यांच्या सुमधुर वाणीतून अभंगवाणीचे सादरीकरण होणार आहे.

 

स्वागत व प्रास्ताविक ह.भ.प. दिनकर शास्री भुकेले (विश्वस्त वारकरी संस्था आळंदी) हे करणार आहेत.

सदर कार्यक्रमाचे आयोजन जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाचे संचालक ह.भ.प राजू महाराज ढोरे, संचालिका डॉ. स्वाती मुळे, तसेच सर्व संचालक मंडळ, प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गाडगे, मुख्याध्यापिका स्नेहल पगार, समन्वयिका मयुरी मुळुक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतपीठाचे प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गाडगे हे करणार आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.