Chinchwad : शहर पोलीस दलातील चार कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर

एमपीसी न्यूज – राज्य पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तसेच ( Chinchwad) गुणवत्तापूर्ण सेवा बजावणाऱ्या 800 जणांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

 

दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी दरम्यान देशभरातील सुरक्षा यंत्रणेत कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती शौर्य पदक (पीएमजी), पोलीस शौर्य पदक (जीएम), राष्ट्रपती पदक (पीएसएम) अशी पदके जाहीर केली जातात. या पदकांसाठी प्रत्येक राज्यातील घटकांमधून शिफारशी सादर केल्या जातात. त्याचप्रमाणे राज्यात देखील पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र जाहीर केले जाते.

 

महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय पोलीस सेवेतील 6 अधिकारी, पोलीस उपायुक्त ते सहायक आयुक्त दर्जाच्या 31 अधिकाऱ्यांसह 800 पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना सन 2023 सालचे पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह ( Chinchwad) आणि प्रशस्तीपत्र जाहीर झाले आहे. याबाबत पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी आदेश दिले आहेत.

 

Nigdi : प्राधिकरणात 3 मे पासून छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमाला

 

मुंबई शहरचे पोलीस उपमहानिरीक्षक परमजीत दहिया, महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथील पोलीस उप महानिरीक्षक निवा जैन, मुंबई शहरच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते, गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल, गडचिरोलीचे अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता, यतीश विजयराव देशमुख या भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे.

 

राज्य पोलीस सेवेतील सहायक आयुक्त ते उपायुक्त दर्जाचे 31 अधिकारी, 54 पोलीस निरीक्षक, 24 सहायक निरीक्षक, 49 उपनिरीक्षक, 140 सहायक उपनिरीक्षक, 333 पोलीस हवालदार, 51 पोलीस नाईक, 108 पोलीस शिपाई यांना हे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे.

 

पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील सहायक पोलीस उपनिरीक्षक बंडू मारणे, पोलीस हवालदार चंद्रधर कोंडे, पोलीस हवालदार सचिन चव्हाण, पोलीस हवालदार हनुमंत कांबळे यांचा यामध्ये समावेश ( Chinchwad)  आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.