Chakan : चार वर्षात पेट्रोलपंप व्यवस्थापांनी केला 1 कोटी रुपयांचा अपहार

एमपीसी न्यूज – पेट्रोल पंपाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या दोन (Chakan) व्यवस्थापकांनी चार वर्षाच्या कालावधीत तब्ब्ल 1 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. ही घटना 2009 ते 2023 या कालावधीत भोसे येथील इंडियन ऑईलच्या गुरुजी पेट्रोल पंपावर घडली आहे.

याप्रकरणी डॉ. अविनाश शांताराम अंकुश (वय 61 रा.नवी मुंबई) यांनी चाकण पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.28) फिर्याद दिली आहे. यावरून सिद्धार्थ भागुजी लगड, अद्वैत प्रताप उर्फ शैलेश रामसिरोमनी सिंग (रा.चाकण)यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Pune : वै. डॉ. रामचंद्र देखणे स्मृती कीर्तन-लोककला सेवा पुरस्कारांची घोषणा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2009 ते 2023 या कालावधीत आरोपींनी पेट्रोल पंपाच्या खात्यातून 3 लाख 60 हजार 166 रुपये रोख घेवून सेल्सबुकमध्ये ऑनलाईन खोटी नोंद केली. तसेच पेट्रोल, डिझेलच्या नोजल ची टेस्टींग न घेता रोखीतून पैसे काढून घेत टेस्टीचे पेट्रोल,डिझेलची कमतरता असल्याचे सांगून दोघांनी मिळून 99 लाख 60 हजार 237 रुपयांचा अपहार केला. असा एकूण 99 लाख 60 हजार 237 रुपयांचा अपहार केला असून 2009 – 2013 मधील (Chakan) 10 सेल्सबुक गहाळ करत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

यावरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून चाकण पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.