Chinchwad : दोन तडीपार गुंडांसह चौघांना अटक; पिस्टल आणि कोयते जप्त

एमपीसी न्यूज – पिंपरी, चिंचवड आणि वाकड पोलिसांनी तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये दोन तडीपार गुंडांसह चौघांना अटक (Chinchwad) केली. त्यामध्ये पिस्टल आणि दोन कोयते अशी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी मंगळवारी (दि. 26) गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

आनंद नामदेव दनाने (वय 31, रा. विद्यानगर, चिंचवड) असे पिंपरी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आनंद दनाने याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी 12 फेब्रुवारी 2024 रोजी दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे.

त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहराच्या हद्दीत आला असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन आनंद याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक कोयता आढळून आला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

विकास उर्फ विक्या अंकुश भिसे (वय 27, रा. दळवीनगर झोपडपट्टी, चिंचवड) असे चिंचवड पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास भिसे याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 2 नोव्हेंबर 2023 रोजी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहरात आला. त्याला चिंचवड पोलिसांनी दळवीनगर येथून अटक केली. (Chinchwad) त्याच्याकडून एक कोयता जप्त करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

Pune: रामदास आठवले यांच्यासाठी शिर्डी लोकसभेची जागा सोडा ;रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ब्राह्मण आघाडी ची मागणी 

वाकड पोलिसांनी माऊली उर्फ ज्ञानेश्वर सुबराव पवार (वय 23, रा. पवारनगर, थेरगाव), अजय म्हस्के (रा. थेरगाव) यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेरगाव येथे दोघेजण संशयितरीत्या थांबले असून त्यांच्याकडे पिस्टल आहे, अशी माहिती वाकड पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन माऊली आणि अजय या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 50 हजार रुपये किमतीचे एक पिस्टल आणि दोन हजार रुपये किमतीचे एक काडतूस जप्त करण्यात आले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.