Pune Loksabha Election : पुणे लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची नियोजन बैठक

एमपीसी न्यूज – पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज (Pune Loksabha Election)काँग्रेस भवन येथे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुणे लोकसभा निवडणुकीच्या नियोजना संदर्भात आज दु. 12 वा., शहर काँग्रेसचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली व त्यानंतर दु. 1 वा., महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक पार पडली.

या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या नियोजना संदर्भात महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी विधानसभा निहाय निवडणुक कचेरी टाकणे, शहर व विधानसभा निहाय समन्वय समिती तयार करणे, दि. 29 मार्च रोजी सायं. 5 वा., इंडिया फ्रंट आघाडीतील घटक पक्षांसोबत बैठकीचे आयोजन, पत्रकामध्ये कोणकोणत्या मुद्दांचा समावेश असावा, महाविकास आघाडीचे विधानसभा निहाय निरिक्षक नेमणे तसेच निवडुकीच्या दृष्टीने विविध कमिट्या तयार करणे या विषयांवर चर्चा करण्यात आली.

या बैठकीत महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निर्धार (Pune Loksabha Election)करण्यात आला.

या बैठकीस पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे, महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी, रमेश बागवे, ॲड.अभय छाजेड, कमल व्यवहारे, दिप्ती चवधरी, संजय बालगुडे, दत्ता बहिरट, अजित दरेकर, अमीर शेख, त्याचबरोबर शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) विभाग प्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे, कल्पना थोरवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष प्रशांत जगताप, अंकुश काकडे, रविंद्र माळवदकर आदींसह महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Chinchwad : दोन तडीपार गुंडांसह चौघांना अटक; पिस्टल आणि कोयते जप्त

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.