Pune: मुरलीधर मोहोळ यांनी घेतली संजयनाना काकडे यांची भेट

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे माजी खासदार संजयनाना काकडे (Pune)यांची पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या निवासस्थानी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट घेतली. यावेळी संजयनानांनी उमेदवारीबद्दल अभिनंदन करत स्वागतपर सन्मान केला. प्रचार नियोजनासह विविध विषयांवर दोघांमध्ये संवाद झाला. 
पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा काकडे यांनी(Pune) व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर मोहोळ आणि काकडे यांची भेट महत्वपूर्ण मानली जात आहे. काकडे यांना मानणारा मोठा नगरसेवकांचा गट पुणे भाजपमध्ये आहे.

Chinchwad : दोन तडीपार गुंडांसह चौघांना अटक; पिस्टल आणि कोयते जप्त

जवळपास 30 नगरसेवक आहेत. 2017 च्या पुणे महापालिका निवडणुकीत भाजपचे 98 नगरसेवक निवडणून येणार असल्याचे काकडे यांनी जाहीर केले होते. त्यानंतर तेवढेच नगरसेवक निवडून आल्याने सर्वांनाच धक्का बसला होता.

 

काकडे हे निवडणुकीचा अंदाज व्यक्त करणारे म्हणून ओळख आहे. भाजपतर्फे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहोळ यांनी गाठीभेटी घेण्यावर भर दिला आहे. यापूर्वी त्यांनी इच्छुक असलेल्या माजी आमदार जगदीश मुळीक यांचीही भेट घेतली होती.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.