Maval : मावळ लोकसभेचा काँग्रेस भवनमध्ये आढावा

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघाचा पुणे येथील काँग्रेस भवनमध्ये आढावा घेण्यात आला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजोग वाघेरे यांना उमेदवारी (Maval) देण्यात आली आहे.मावळ लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे.

यावेळी पुणे जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस पृथ्वीराज पाटील,मावळ लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक कौस्तुभ गुजर,खजिनदार बापूसाहेब ढमढेरे,संग्राम मोहोळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मावळ लोकसभा आढावा बैठक काँग्रेस भवन पुणे येथे जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी मावळ लोकसभा मतदार संघासाठी समन्वय समितीची स्थापना काँग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात आली. यामध्ये काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर,महाराष्ट्र प्रदेश सचिव निखिल कवीश्वर,तालुका अध्यक्ष यशवंत मोहोळ,सांस्कृतिक सेल जिल्हाध्यक्ष विशाल वाळुंज, तळेगाव शहराध्यक्ष यादवेंद्र खळदे, युवक अध्यक्ष राजेश वाघोले,देहूरोड ब्लॉक अध्यक्ष हाजी मलंग मारेमत्तू, प्रमोद गायकवाड,दिलीप ढमाले, राजीव फलके,प्रीतम हिरे,माऊली काळोखे,  तळेगाव स्टेशन अध्यक्ष योगेश पारगे, माजी उपनगराध्यक्ष लोणावळा राजीव गवळी यांची निवड करण्यात आली.
आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या (Maval) पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार संजोग  वाघेरे यांचा प्रचार काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे करावा व स्वतःला झोकून देऊन वाघेरे यांना प्रचंड बहुमताने विजय करावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष जगताप यांनी केले. ही निवडणूक लोकशाही वाचवण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण निवडणूक असल्याचेही त्यांनी नमूद केले जर ही निवडणूक विरोधक जिंकले तर भविष्य काळामध्ये निवडणूक होतील की नाही याची खात्री सर्वसामान्य नागरिकाला राहिलेली नाही असे त्यांनी आपल्या मनोगत मध्ये भावना व्यक्त केल्या. काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मानपूर्वक वागणूक दिली जाईल व शिवसेना जिल्हाप्रमुख यांनाही यादी सुपूर्त केली जाईल व लवकरच मावळ लोकसभेमध्ये शिवसेना काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे बैठकीचे नियोजन करून प्रचाराला सुरुवात करण्यात येईल असे यावेळी त्यांनी सांगितले.

 

मावळमधून लोकसभेच्या  जागेसाठी महायुतीकडून श्रीरंग बारणे यांना तर महाविकास आघाडी मधून संजोग वाघेरे यांच्यामध्ये लढत होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.