LokSabha Elections 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी जाहीर, ‘यांना’ मिळाली उमेदवारी

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीसाठी (LokSabha Elections 2024) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिली यादी 5 उमेदवारांची असून लवकरच दुसरी यादी देखील जाहीर होईल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

अपेक्षप्रमाणे बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे यांना चौथ्यांदा उमेदवारी मिळाली आहे. त्यांची लढत बंधू, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी होण्याची शक्यता आहे. या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. तर, शिरुर लोकसभा मतदारसंघातून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना दुस-यांदा उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांची लढत शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेल्या शिवाजीराव आढळराव यांच्यासोबत लढत होणार आहे.

Hinjawadi : हिंजवडी आयटीपार्क परिसरात बिबट्याच पिल्लू आढळले

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आमदारकीच्या राजीनामा दिलेल्या निलेश लंके यांना अहमदनगरमधून उमेदवारी (LokSabha Elections 2024 ) जाहीर झाली आहे. त्यांची लढत भाजपचे सुजय विखे यांच्याशी होणार आहे. तर, वर्ध्यातून अमर काळे, दिंडोरीतून भास्करराव भगरे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.