Hinjawadi : हिंजवडी आयटीपार्क परिसरात बिबट्याच पिल्लू आढळले

एमपीसी न्यूज – हिंजवडी आयटी पार्क परिसरातील (Hinjawadi) एका शेतात नवजात बिबट्याचे पिल्लू आढळून आले आहे. या बिबिट्याच्या बछड्याला वनविभाग आणि अॅनिमल रेस्क्यू टीमने ताब्यात घेतले आहे.

हिंजवडी परिसरात ऊसतोडणी वेगात असल्याने बिबट्या व त्यांचे बछडे आढळण्याचे प्रकार घडते आहेत. आज (शनिवारी ) नेरे येथील ऊसाच्या फडात बिबट्याच्या नर जातीचा एक नवजात बछडा आढळून आला. हिंजवडी आयटीलगत अगदी पाच किमी अंतरावरील नेरे येथील शेतकरी राहुल जाधव यांच्या शेतात ऊसतोड करताना एका मजुराला हा बछडा आढळला. पौडचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण, वनपाल प्रज्ञा बनसोडे, आयटी पार्क हिंजवडीचे वनरक्षक पांडूरंग कोपनर, अॅनिमल रेस्क्यू टीम, वाईल्ड अॅनिमल अँड स्नेक प्रोटेक्शन, वन्यजीव रक्षक संघटेनेचे स्वयंसेवक (Hinjawadi) दाखल झाले.

LokSabha Elections 2024 : मावळचे महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी घेतले दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन

बछडा ज्या ठिकाणी सापडला, त्याच ठिकाणी सायंकाळी त्याला सोडण्यात आले. कॅमेरे सेट केले गेले आहेत. याद्वारे त्यांची निरीक्षणे नोंदविली जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरू नये असे आवाहन पौडचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण यांनी केले आहे. जोपर्यंत मादी बछड्याला घेऊन जात नाही. तोपर्यंत दोन-तीन दिवस ऊसतोड बंद ठेवण्याच्या सूचना वन विभागाने शेतकरी जाधव यांना दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.