LokSabha Elections 2024 : मावळचे महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी घेतले दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन

एमपीसी न्यूज – शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)- राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीचे मावळचे अधिकृत उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (दि. 30 मार्च) पिंपळेगुरव येथील भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. चिंचवड परिसरात प्रचाराला (LokSabha Elections 2024)सुरुवात केली.

 

महायुतीकडून उमेदवारी जाहीर होताच खासदार बारणे यांनी दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या  स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप, माजी नगरसेवक शशिकांत कदम, उद्योजक रवि नामदे उपस्थित होते. खासदार बारणे (LokSabha Elections 2024) यांनी  लोकनेते लक्ष्मण जगताप यांच्या निवासस्थानीही सदिच्छा भेट दिली. आमदार अश्विनी जगताप, शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्यासोबत संवाद साधत लक्ष्मणभाऊंच्या आठवणींना उजाळा दिला.

Jalna : वसंत मोरे यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट

भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले की, फिर एक बार मोदी सरकार, अबकी बार 400 पार… हे साध्य करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे काम सुरु आहे.  महायुतीची अधिकृत उमेदवारी खासदार श्रीरंग बारणे यांना जाहीर झाली आहे. उमेदवार निश्चित झाल्याने भाजपने झोकून देऊन काम सुरु केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी शहर भाजपची संघटना, कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

श्रीरंग बारणे  ह्यांना आत्तापर्यंत पाच वेळा उत्कृष्ट संसदपटू आणि एक वेळा संसद महारत्न म्हणून गौरवण्यात आले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून श्रीरंग बारणे (एकनाथ शिंदे गट) आणि संजोग वाघेरे (उद्धव ठाकरे गट) यांच्यामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे हे उद्या रविवारी तळेगावदाभाडे येथे जाणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे आमदार सुनील शेळके तसेच भाजपचे नेते, माजी राज्यमंत्री बाळा उर्फ संजय भेगडे यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे समजते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.