Pune: रामदास आठवले यांच्यासाठी शिर्डी लोकसभेची जागा सोडा ;रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ब्राह्मण आघाडी ची मागणी 

एमपीसी न्यूज – कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन रामदास आठवले (Pune)यांना शिर्डी लोकसभेची जागा सोडलीच पाहिजे, अशी आग्रही मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ब्राह्मण आघाडीतर्फे करण्यात आली.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या ब्राह्मण आघाडीतर्फे आज बारामती लोकसभा मतदार(Pune) संघाच्या वस्ताद आणि पैलवान यांचे साठी आयोजित मेळाव्यात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री मा छगन भुजबळ यांची भेट घेऊन रामदास आठवले यांचे साठी शिर्डी लोकसभा मतदार संघाची जागा सोडावी, या बाबत सर्व कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत.

 

Chinchwad: गॅस चोरी प्रकरणी एकास अटक 

उद्या या बाबत राज्य कार्यकारिणी बैठक आयोजित केलेली आहे, तरी तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Pune)आणि उपमुख्य मंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेऊन जागा सोडावी. सन्मान जनक भूमिका लवकर जाहीर करावी अशी आग्रही मागणी करण्यात आली.
याबाबत मी तर सकारात्मक आहे आणि उद्या आमची या बाबत बैठक आहे त्यात तुमची मागणी मी नक्की मांडून पाठपुरावा करेन असे आश्वासन दिले.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस चे शहर अध्यक्ष दीपक मानकर, रिपब्लिकन एम्प्लॉइज फेडरेशन चे PMPML युनिट अध्यक्ष नागेश गायकवाड, रिपब्लिकन ब्राह्मण आघाडीचे प्रमोद दिवाकर, अनिरुद्ध जोशी, मुकुल देशपांडे, प्रसाद आठवले, किरण मजुमदार आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते, अशी माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ब्राह्मण आघाडीचे अध्यक्ष  ॲड मंदारभाऊ जोशी यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.