Pimple Guruv: बनावट कागदपत्रांच्या आधारे महिलेची 22 लाख रुपयांची फसवणूक 

एमपीसी न्यूज – बनावट सह्यांच्या आधारे कागदपत्रे बनवून संयुक्त नावावर (Pimple Guruv)असलेली सदनिका विकून महिलेची 22 लाख 50 हजारांची फसवणूक केली. हा प्रकार 2 जानेवारी 2015 ते 26 मार्च 2024 या कालावधीत पिंपळे गुरव येथे घडला. 
राजेंद्र दयाप्रसाद गायकवाड, सुलक्षण राजेंद्र गायकवाड, लक्ष्मण बळीराम (Pimple Guruv)जाधव (तिघे रा. पिंपळे गुरव), सदाशिव अच्युतराव परभणे (रा. काळेवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

LokSabha Elections 2024 : PMPML च्या चालक, वाहकांचा 100 टक्के मतदान करण्याचा निर्धार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीजल अपार्टमेंट, पिंपळे गुरव येथे फिर्यादी आणि आरोपी राजेंद्र गायकवाड यांच्या संयुक्त नावावर एक सदनिका आहे. आरोपींनी आपसात संगनमत करून महिलेच्या बनावट सह्यांच्या आधारे कागदपत्रे बनवली. त्यातून ती सदनिका 22 लाख 50 हजार रुपयांना विकून महिलेची फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.