LokSabha Elections 2024 : PMPML च्या चालक, वाहकांचा 100 टक्के मतदान करण्याचा निर्धार

एमपीसी न्यूज – पुणे महानगर परिवहन लिमिटेडच्या निगडी डेपो येथील शेकडो ( LokSabha Elections 2024) वाहनचालक, वाहक यांनी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याची शपथ घेतली. 100 टक्के  मतदान करण्याचा निर्धार केला.

लोकसभा निवडणुकीत 100 टक्के मतदान करण्याच्या दृष्टीने सर्व वाहन चालक, वाहक यांनी स्वत: मतदान करावे. शिवाय वाहक, कर्मचा-यांनी शहरातील विविध मार्गावर धावत असताना बसमधील प्रवाशांनाही मतदान करण्यासाठी सौजन्यपणे विनंती करून लोकशाही प्रती आपले कर्तव्य बजाविण्याचे  आवाहन करावे, असे  मावळ लोकसभा मतदारसंघाचे तसेच 206 पिंपरी विधासभेचे  नोडल अधिकारी तथा महापालिकेचे सहाय्यक आयुक्त मुकेश कोळप यांनी केले.

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड यांच्या निगडी येथील बस डेपो येथे आगार व्यवस्थापक यशवंत हिंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत वाहनचालक, वाहक यांनी मतदानाची शपथ घेऊन मतदान करण्याचा निर्धार केला. यावेळी मतदान जनजागृती पर मार्गदर्शन करताना नोडल अधिकारी कोळप बोलत होते. या कार्यक्रमास जनता  संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, पिंपरी डेपोचे व्यवस्थापक भास्कर दहातोंडे, कार्यालय अधीक्षक लक्ष्मण कावळे तसेच डेपो कर्मचारी उपस्थित होते.

Pimpri : टोळक्याकडून कोयत्याचा धाक दाखवून तरुणाला लुटले, एकाला अटक

निगडी बस डेपो व्यवस्थापक यशवंत हिंगे यांनी डेपोच्या सर्व कर्मचाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याच्या सूचना दिल्या. तसेच लोकशाही प्रतिष्ठा ठेवून मतदानाचे महत्त्वाचे योगदान सर्वांनी पार पाडावे असे आवाहनही केले. जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी मतदान शपथेचे वाचन केले तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी प्रवासात जाता – येता तसेच जवळच्या मित्रमंडळी तसेच सोशल मिडीयावर देखील मतदान करण्याचा प्रचार,प्रसार करावा असे ( LokSabha Elections 2024)  सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.