Pimpri : टोळक्याकडून कोयत्याचा धाक दाखवून तरुणाला लुटले, एकाला अटक

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड शहरात देखील आता कोयता गँग तोंड वर काढत असून कार ( Pimpri ) चालकाला कोयत्याचा धाक दाखवून त्याला लुटण्यात आले आहे. ही घटना सोमवारी (दि.25) बोपखेल येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

आकाश  गिरीगोसावी (वय 30 रा. बोपखेल) असे अटक आरोपीचे नाव असून त्याच्यासह सोन्या तांबे, विकी पिल्ले, शुभम अहिरराव, अजय पिल्ले व इतर चार ते पाच जण यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अभिजीत ओमप्रकाश अगरवाल (वय 35 रा. बोपखेल) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Loksabha Election 2024 : मतदानासाठी एक एप्रिलपासून 47 हजार कर्मचाऱ्यांना मिळणार प्रशिक्षण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची कार बोपखेल येथील शितळादेवी मंदिराजवळ पार्क केलेली होती. यावेळी आरोपी आले व त्यांनी हातातील कोयते दाखवून फिर्यादीला मी इथला भाई आहे म्हणत दटावण्यास सुरुवात केली. पुढे त्यांनी फिर्यादी कडील 560 रुपये रोख काढून घेत त्यांच्या कारच्या काचा कोयत्याने फोडून 10 हजार रुपयांचे नुकसान केले. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत ( Pimpri ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.