Chinchwad: गॅस चोरी प्रकरणी एकास अटक 

एमपीसी न्यूज – घरगुती वापराच्या सिलेंडर मधून चोरून गॅस काढणाऱ्या एकास गुन्हे शाखा युनिट दोनने (Chinchwad)अटक केली आहे. त्याच्या ताब्यातील 16 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 26) दुपारी साडेबारा वाजता रामनगर, चिंचवड येथे करण्यात आली.
प्रदीप तुकाराम मगर (वय 40, रा. तापकीर चौक, काळेवाडी) असे अटक केलेल्या (Chinchwad)आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सागर अवसरे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

Pimpri : टोळक्याकडून कोयत्याचा धाक दाखवून तरुणाला लुटले, एकाला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रदीप मगर याने घरगुती वापराच्या भरलेल्या सिलेंडर मधून लहान सिलेंडर मध्ये गॅस चोरून काढला. गॅस चोरी करत असताना त्याने ज्वालाग्राही पदार्थांबाबत कोणतीही खबरदारी घेतली नाही. याबाबत माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट दोनने छापा मारून कारवाई करत प्रदीप मगर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 16 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.