Pimpri : रंग लावण्यावरून वाद घालत तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – धुलीवंदनाच्या दिवशी रंग लावण्यावरून चार (Pimpri) जणांनी एका तरुणासोबत वाद घातला. त्यानंतर तरुणाच्या घरी येऊन त्याच्यावर कोयत्याने वार करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 25) दुपारी सेनेटरी चाळ, पत्रा शेड, पिंपरी येथे घडली.

नॉडी गायकवाड (रा. आंबेडकर कॉलनी, पिंपरी), कार्तिक शेट्टी (रा. मिलिंदनगर, पिंपरी), ओम सावंत, अजित निकम (रा. आंबेडकर कॉलनी, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी प्रेम सचिन मोरे (वय 18, रा. सेनेटरी चाळ, पत्रा शेड, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुलीवंदनाच्या दिवशी दुपारी फिर्यादी प्रेम हे त्यांच्या घराच्या खाली थांबले होते. त्यावेळी त्यांच्या ओळखीचे आरोपी रंग लावण्यासाठी तिथे आले. ‘माझ्या घरी पाहुणे (Pimpri) आले आहेत. त्यामुळे आपण रंग नंतर खेळू असे प्रेम यांनी आरोपींना सांगितले. तरीही आरोपींनी प्रेम यांना रंग लावला. त्यावरून त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर आरोपी तिथून निघून गेले.

LokSabha Elections 2024 : PMPML च्या चालक, वाहकांचा 100 टक्के मतदान करण्याचा निर्धार

प्रेम यांच्या घरी जेवणाचा कार्यक्रम असल्याने ते भाजी आणण्यासाठी मंडईत गेले होते. तिथे त्यांना पुन्हा आरोपी दिसले. त्यामुळे ते पळून घरी आले. आरोपी देखील प्रेम यांच्या पाठीमागे आले. प्रेम घराचा दरवाजा लाऊन बसले होते.

आरोपींनी प्रेम यांच्या घराच्या दरवाजावर लाथा मारून शिवीगाळ केली. त्यांच्या घरात येऊन त्यांच्यावर कोयत्याने वार केले. तसेच त्यांना लाथाबुक्क्यांनी मारून शिवीगाळ करून आरोपी निघून गेले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.