Loksabha Election : उत्तर मध्य मुंबईमधून ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांना भाजपने दिली उमेदवारी

विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट

एमपीसी न्यूज – उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांची उमेदवारी भाजपने जाहीर केली असून त्यांची लढत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड(Loksabha Election) यांच्याशी होणार आहे.

 

याबाबतची सविस्तर माहिती अशी आहे की, उत्तर मध्य मुंबईमधून कोणाला उमेदवारी द्यायची याची चर्चा महायुती नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु होती.सध्याच्या वर्तमान खासदार पूनम राव महाजन यांना मतदारसंघात होत असलेला विरोध यामुळे भाजपचे राज्यातील नेते नवीन चेहऱ्याला संधी देण्याच्या प्रयत्नात गेल्या काही दिवसांपासून होते. त्यात त्यांना यश मिळाले असून भाजपने उज्ज्वल निकम यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करून उत्तर मध्य मुंबईतील जागेवर शिक्कामोर्तब केले आहे. उज्ज्वल निकम ह्यांनी सरकारी वकील म्हणून अनेक खटल्यांमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. दहशतवादी कसाबविरुद्ध खटल्यात त्यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले असून त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

 

Loksabha Election: मानवजातीची सेवा करणाऱ्या डॉक्टरांच्या समस्यांचे लवकरच निराकरण – बारणे

या मतदारसंघातून उज्ज्वल निकम यांची लढत काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड(Loksabha Election) यांच्याशी होणार असून या लढतीमध्ये कोण जिंकेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.