Mumbai : ज्योतिषी विमलचंद बाफना यांच्याकडून ज्योतिष सल्ला घेण्यासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – मुंबईतील खार वेस्ट येथील जी.ए.कुलकर्णी बँक्वेट हॉल मध्ये 13, 14 एप्रिल 2024 रोजी ‘ अॅस्ट्रो वर्ल्ड ‘चे आयोजन ( Mumbai ) करण्यात आले. यामध्ये प्रसिद्ध ज्योतिषी विमलचंद बाफना यांच्याकडून माफक मूल्य आकारून  हस्तरेषा शास्त्राचा अनेकांनी सल्ला घेतला. या प्रदर्शनात विमलचंद बाफना यांच्याकडून ज्योतिष सल्ला घेण्यासाठी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
विमलचंद बाफना हे अत्यंत अनुभवी आणि हस्तरेषाशास्त्राच्या क्षेत्रात प्रसिद्ध आहेत. त्यांनी रसायनशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण (Mumbai) घेतले आहे. महर्षी दयानंद महाविद्यालय, मुंबई येथून 1983 मध्ये सुवर्णपदकाने त्यांना सन्मानित केले आहे. त्यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, राजकारणी, अभिनेत्यांची हस्तरेषा पाहिली आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लोकांचे हस्तरेषा वाचल्या आहेत आणि गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी हस्तरेषाशास्त्रा संबंधित प्रचंड माहिती संकलित केली आहे.
गेले 40 वर्षांपासून ज्योतिषी विमलचंद बाफना अविरतपणे ह्या क्षेत्रात काम करत आहेत तसेच त्यांनी हस्तरेषा शास्त्राचा सल्ला घेणाऱ्यांकडून आलेल्या पैशातून वृद्ध, विधवा महिलांना तांदूळ, गहू, इतर अन्नधान्य असलेले कीट वाटतात. हिंदू धर्मामध्ये गो-दानाला प्रचंड महत्त्व आहे म्हणून त्यांनी आजपर्यंत गो-दानासाठी भरपूर प्रमाणात पैसे दिले आहेत. त्यांनी त्यांच्या रसायनशास्त्र विषयातील पदव्युत्तर शिक्षणाचा अनुभवाद्वारे संशोधन आणि विकास क्षेत्रात भरघोस योगदान दिले आहे. त्यांनी गेली 35 वर्षे शास्त्रज्ञ म्हणून काम केलेले आहे.
ज्योतिषी बाफना यांनी खूप चांगला सल्ला दिला. त्यांनी दिलेला सल्ला अत्यंत मोलाचा असल्याच्या प्रतिक्रिया ( Mumbai ) नागरिकांनी व्यक्त केल्या.

 

 

Chikhli : डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रा.स्व.संघातर्फे चिखलीमध्ये स्वदेशी खेल महाकुंभ

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.