Salman Khan : अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार

एमपीसी न्यूज – बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याच्या (Salman Khan)घराबाहेर गोळीबार झाल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना रविवारी (दि. 14) पहाटे पाच वाजताच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास (Salman Khan)दुचाकीवरून दोन संशयित आले. त्यांनी सलमान खानच्या गॅलॅक्सी अपार्टमेंट या घराबाहेर गोळीबार केला. संशयितांनी चार राउंड फायर केल्याचे म्हटले जात आहे.

Maval : श्रीरंग बारणे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा मावळ भाजपचा निर्धार

गोळीबार केल्यानंतर संशयित पळून गेले आहेत. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा सलमान खानच्या घराबाहेर तैनात करण्यात आला आहे. वांद्रे पोलीस, गुन्हे शाखा आणि विविध पथके आरोपींचा माग काढत आहेत. दरम्यान फॉरेन्सिक टीम देखील घटनास्थळी दाखल झाली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.