Maval : श्रीरंग बारणे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा मावळ भाजपचा निर्धार

एमपीसी न्यूज – कामशेत येथे मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे (Maval )अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र भाजपचे प्रभारी  दिनेश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत मावळ विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते,सुपर वॉरियर्स व बूथ अध्यक्ष यांचा संवाद मेळावा झाला. या मेळाव्यात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा निर्धार केला.
यावेळी भाजपा पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे,(Maval )भाजपा पुणे उत्तर जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, मावळ लोकसभा समन्वयक सदाशिव खाडे, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख योगेश बाचल, मावळ भाजपा अध्यक्ष दत्तात्रय गुंड, मा.सभापती गुलाब म्हाळसकर,युवा मोर्चा प्रदेश सचिव रघुवीर शेलार, प्रदेश भाजपा निमंत्रित सदस्य जितेंद्र बोत्रे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष किरण राक्षे,ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष दत्तात्रय माळी, लोकसभा विस्तारक भूषण जोशी, विधानसभा विस्तारक,रविंद्र देशपांडे,  तळेगाव शहर भाजपा अध्यक्ष अशोक  दाभाडे, लोणावळा शहर भाजपा अध्यक्ष अरुण लाड, देहूरोड शहर भाजपा अध्यक्ष  रविंद्र उर्फ लहू शेलार, युवा मोर्चा अध्यक्ष नितीन मराठे, महिला मोर्चा अध्यक्षा सायली बोत्रे यांच्यासह मावळ विधानसभा मंडळ संघातील सर्व मंडळाचे सरचिटणीस, सर्व सुपर वॉरियर्स,बूथ अध्यक्ष व आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुरुदत्त मंगल कार्यालय कामशेत येथे (दि12) मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे साहेब यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र भाजपचे प्रभारी दिनेश शर्मा  यांच्या प्रमुख उपस्थितीत मावळ विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते,सुपर वॉरियर्स व बूथ अध्यक्ष यांचा संवाद मेळावा उत्साहात संपन्न झाला.
यावेळी दिनेश शर्मा यांनी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. व नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा .पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले.
तसेच ज्यांनी राम मंदिर निर्माण कार्यास विरोध केला,ज्यांनी 370 कलम हटविण्यास विरोध केला अशा काँग्रेस, शरद पवार गट व शिवसेना उद्धव ठाकरे गटाला या निवडणुकीतून आपण हद्दपार करावे व विकसित भारतासाठी मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागण्याच्या सूचना केल्या.
त्याचसोबत मावळ विधानसभा कोअर कमिटीचे प्रमुख पदाधिकारी यांच्यासोबत देखील दिनेश शर्मा यांनी बैठक घेऊन मावळ विधानसभा मतदारसंघातील संघटनात्मक कार्याचा आढावा घेऊन महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी महायुतीतील सर्व घटक पक्षांशी समन्वय ठेऊन कार्य करण्याच्या सूचना दिल्या.
तसेच श्रीरंग आप्पा बारणे यांना मावळ विधानसभा मतदार संघातून 50 हजारांहून अधिक मतांची आघाडी मिळवून देऊ असे आश्वासन निवडणूक प्रमुख रविंद्र आप्पा भेगडे यांनी यावेळी बोलतांना दिले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.