Today’s Horoscope 14 April  2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 14 April  2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – रविवार.

तारीख – 14.04.2024.

शुभाशुभ विचार – चांगला दिवस.

आज विशेष – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती.

राहू काळ – संध्याकाळी 4.30 ते 06.00.

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आज नक्षत्र – आर्द्रा.

चंद्र राशी – मिथुन. 
—————————–
मेष- ( शुभ रंग- मोतिया)
दैनंदिन कामात काही अडथळे येतील. तुमचा बराचसा वेळ रिकामटेकड्या गप्पांमध्ये फुकट जाईल. नकारात्मक मंडळींपासून लांबच रहा. झाकली मूठ झाकलीच ठेवावी.

वृषभ (शुभ रंग- राखाडी)
आज कार्यक्षेत्रात तुमच्या वक्तृत्वाचा व कर्तुत्वाचाही चांगलाच प्रभाव पडेल. भावंडांमध्ये मात्र काही कारणाने मतभेद संभवतात. आज गरजेपुरतेच बोलणे हिताचे राहील.

मिथुन (शुभ रंग – क्रीम)
आज घराबाहेर रागीट स्वभावावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. व्यवसायातील स्पर्धेला तोंड देण्यासाठी अथक परिश्रम गरजेचे आहेत. शांत डोक्याने निर्णय घ्यावेत.

कर्क ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज तुमचे मन काहीसे चंचल असणार आहे. आपले काम सोडून उगीचच इतरांच्या भानगडीत डोकवाल. अनावश्यक खर्चावर ताबा ठेवा. प्रवासात सतर्क रहा.

सिंह ( शुभ रंग- आकाशी)
आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून सर्व कामे विना व्यत्यय पार पडतील. काही कारणाने दुरावलेली मित्रमंडळी जवळ येतील. अनपेक्षित लाभाचा दिवस.

कन्या (शुभ रंग- मोरपंखी)
आज नोकरदार वरिष्ठांच्या मर्जीत राहतील. उच्चशिक्षित तरुणांना चांगल्या पॅकेजच्या उत्तम संधी चालून येतील. कार्यक्षेत्रात वेळीच घेतलेले तुमचे निर्णय योग्य ठरतील.

तूळ (शुभ रंग- पांढरा)
उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने आजचा दिवस तितकासा अनुकूल नसल्याने नवे उपक्रम उद्यावर ढकललेले बरे. ज्येष्ठ मंडळींनी आज सत्संगात रमणेच हिताचे राहील.

वृश्चिक ( शुभ रंग- सोनेरी)
आज तुम्हाला काही तब्येतीच्या तक्रारी त्रस्त करतील. काही मोफत सल्लागार मंडळी आज खूपच बोअर करतील. आज आपल्या स्वार्थाकडे लक्ष द्या. परमार्थ परवडणार नाही.

धनु (शुभ रंग- पिस्ता)
कार्यक्षेत्रात प्रगतीची चक्रे गतिमान राहतील. वेळेचे योग्य नियोजन केल्याने ध्येय प्राप्तीकडे वेगाने वाटचाल कराल. कौटुंबिक वातावरण सामंजस्याचे राहील. सामान्य दिवस.

मकर (शुभ रंग- भगवा)
नोकरदारांवर कामाचा ताण वाढणार आहे. वरिष्ठांचे काही केले तरी समाधान शक्य नाही. ज्येष्ठ मंडळींना काही आरोग्यविषयक तपासण्या करून घ्याव्या लागतील.

कुंभ ( शुभ रंग- डाळिंबी)
मुलांची शैक्षणिक प्रगती समाधानकारक राहील. आज सहकुटुंब चैन करण्यासाठी वेळ काढाल. आर्थिक सुबत्ता राहील. रुग्णांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा दिसून येईल.

मीन (शुभ रंग- जांभळा)
बरेच दिवसापासून रखडलेल्या घरगुती कामात आज लक्ष द्यावे लागेल. मुलांची संगतही तपासून पाहणे गरजेचे आहे. गृहिणींना गृह उद्योगातून चांगली मिळकत होईल.

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.