Talegaon Dabhade : डाॅ. ओंकार बाळसराफ यांना डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाकडून पीएचडी प्रदान

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील ओंकार डेंटल क्लिनिक, सिंहगड डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील(Talegaon Dabhade) प्रा. डाॅ. ओंकार बाळसराफ यांना डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाकडून डेंटल ( conservative dentistry and endodontils) या विषयाची पीएचडी प्रदान करण्यात आली. डी.वाय.पाटील डेंटल काॅलेजचे डीन डाॅ. गोपालकृष्नन यांच्या हस्ते डॉ. बाळसराफ यांना पीएचडी प्रदान करण्यात आली.

पिंपरीतील डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचा 15 वा पदवीप्रदान समारंभ शनिवारी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाला.  विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, प्र- कुलगुरू डॉ. स्मिता जाधव, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, विश्वस्त डॉ. यशराज पाटील यावेळी उपस्थितीत होते. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ आणि सिम्बायोसिसचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. एस.बी. मुजुमदार यांना शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ठ योगदानाबद्दल मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान करण्यात आली.

सिंहगड डेंटल कॉलेजमध्ये डाॅ. ओंकार बाळसराफ हे दहा वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांनी cbitosan nanoparticler चा वापर करून रूट कॅनालसाठी वापरण्यात येणारे endodontic irrigants, medicaments आणि bromaterial आणखी विकसित करून रूट कॅनाल ट्रीटमेंट अधिक शास्वत करण्याचा प्रयत्न केला. नॅनोटेक्नॉलॉजीचा वापर करून रूट कॅनाल ट्रीटमेंट अधिक सुखकारक करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. या शोध निबंधामध्ये त्यांनी नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सेस आणि आयआयटी रुरकी यांची मदत घेतली. कॉन्फोकल मायक्रोस्कोपी आणि अटोमीक फोर्स मायक्रोस्कोपी अशी आधुनिक उपकरणे वापरून सखोल अभ्यास केला. डाॅ. ओंकार बाळसराफ यांनी पीएचडी दरम्यान 4 आतंरराष्ट्रीय राष्ट्रीय परिषदेमध्ये सहभाग घेतला. 2 पेपर प्रकाशन केले आणि 2 पेटंट फाईल केले. यासाठी त्यांना  डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठामधील गाईड डॉ.श्रीनिधी एस.आर, डॉ.संजोत मुळे, डॉ.राजेश शेट्टी आणि डॉ. प्रदीप शेट्टी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सिंहगड डेंटल कॉलेजमधून डॉ. समीर पाटील, डॉ.दीपाली शहा, डॉ.निरंजन जोशी यांचे मार्गदर्शन लाभले. सिंहगड संस्थेचे अध्यक्ष प्रा.एम.एस.नवले आणि सचिव सुनंदा नवले यांनी डाॅ. ओंकार बाळसराफ यांचा सत्कार करून कौतुक केले. ओंकार डेंटल क्लिनिकच्या माध्यमातून डाॅ. ओंकार बाळसराफ आणि डॉ.ऐश्वर्या हे दाम्पत्य अत्यंत आधुनिक आणि अद्ययावत सुविधा क्लिनिकमध्ये देत आहेत.

Pimpri : प्रबोधनपर्वात मतदान जनजागृती पथनाट्य सादर

डाॅ. ओंकार बाळसराफ म्हणाले की, मिळालेली पदवी अथक परिश्रमाची पावती आहे. या प्रवासात  पत्नी डॉ.ऐश्वर्या हिचा मोलाचा वाटा आहे. पुढील संशोधनात आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून पेंशट ट्रीटमेंट अधिक सुखकर करण्याचा मानस आहे.

 

 

 

https://www.youtube.com/watch?v=NFtTw2DPu6I&ab_channel=MPCNews

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.