Wakad: सात दिवसांच्या बालकाची तस्करी करणाऱ्या महिलांची टोळी जेरबंद, आतापर्यंत 5 बालकांची केली होती विक्री

एमपीसी न्यूज-  नवजात बालकाची तस्करी करू पाहणाऱ्या 6 महिलांना  (Wakad) वाकड पोलिसांनी मोठ्या शिताफीने  अटक केली. ही कारवाई पोलिसांनी शुक्रवारी (दि.12) जगताप डेअरी परिसरात करण्यात आली. आरोपी महिला या सराईत असून त्यांनी आतापर्यंत 5 बालकांची तस्करी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना त्यांच्या बातमीदारामार्फत एका बालकाची (Wakad) विक्री होणार असल्याची माहिती मिळाली. यावेळी पोलिसांनी बातमीदाराकरवीच त्यांना बाळ खरेदी करण्याची ऑफर दिली.

त्यानुसार जगताप डेअरी परिसरात दोन रिक्षांमधून 6 महिला आल्या. पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या नवजात बालकाबाबत पोलिसांनी चौकशी केली असता त्या महिलांनी उडवाउडवीची उत्तर दिली. त्यांचे मोबाईल तपासले असता त्यांनी संबंधित बाळ विकणार असल्याचे संभाषण पोलिसांच्या तपासात समोर आले.

पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता  या महिला संबंधित बालकाला पाच लाख रुपयांना विकणार असल्याचे त्यांनी कबूल केले. महिलांवर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

संबंधित महिला या सराईत असून त्यांनी याआधीही पाच बालकांना लाखो रुपयांना विकल्याचे कबूल केले आहे. या रॅकेटची पाळेमुळे शोधून काढण्याचा अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.

Pune : भारताच्या मालकीची किती बेटे आहेत,हे परराष्ट्र मंत्र्यांना माहिती आहे का ?- काँग्रेसचे माजी आमदार उल्हास पवार यांचा सवाल 

ही कारवाई वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर, पोलीस निरीक्षक गुन्हे विठ्ठल साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक रविकिरण नाळे, सचिन चव्हाण, अनिरुद्ध सावर्डे, बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, सहाय्यक पोलीस फौजदार राजेंद्र काळे, पोलीस अंमलदार वंदू गिरे, संदीप गवारी, स्वप्नील खेतले, अतिश जाधव, प्रमोद कदम, दीपक साबळे, प्रतीक शेख, विक्रांत चव्हाण, प्रशांत गिलबिले, रामचंद्र तळपे, विनायक घारगे, अजय फल्ले, सौदागर लामतुरे, स्वप्नील लोखंडे, कौंतेय खराडे, भास्कर भारती, रमेश खेडकर, ज्ञानदेव झेंडे, महिला अंमलदार रेखा धोत्रे, जयश्री वाखारे, ज्योती तूपसुंदर यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.