Chikhli : डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रा.स्व.संघातर्फे चिखलीमध्ये स्वदेशी खेल महाकुंभ

एमपीसी न्यूज – डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चिखली नगरातर्फे भव्य स्वदेशी खेळ महाकुंभाचे रविवारी (दि.14) सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत चिखली भागातील म्हेत्रे ( Chikhli ) उद्यानात करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत शारीरिक शिक्षण प्रमुख निलेश भंडारी, जिल्हा सहकार्यवाह जयंत जाधव यांच्यासह आदी उपस्थित होते.

Chinchwad : वर्षभरात तीन पोलिसांचा अपघाती मृत्यू

या खेळ महाकुंभात लगोरी,लंगडी,विटीदांडू,काची गोट्या,चकारी,रस्सीखेच,अंधारी कोशिंबीर,,मामाच पत्र, गजगे,चिंचुके,,भवरा,कांदा फोडी,कोया,साखळी कागदाचा चेंडू,कागदाचे विमान उडवाउडवी, काचकवड्या,संगीत खुर्ची,नौका युद्ध,लड्डू फोड, चिरघोडा,कुलूप किल्ली,सापाची झोप,गाव गुंड, तीन पाय शर्यत,वारे भोंदू,चीपरी -टिपऱ्या,मर्दानी खेळ, कबडी,कराटे,असे 32 प्रकारचे पारंपरिक पद्धतीचे खेळ खेळले गेले. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी या खेळाचा आनंद घेतला.

सध्याची मुलांची जीवनशैली, सोशल मीडियाचा अतिवापर, मैदानांची वानवा हे सर्व आव्हाने समोर असताना मुलांना स्वदेशी खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन, खेळाचे प्रात्यक्षिके, पिण्याचे पाणी, फळे, प्रथमोचार अशा सर्व सोईसोबतच मोठ्या आखीव मैदानात स्वदेशी खेळाचे सर्व साहित्य उपलब्ध करून आयोजकांनी उत्तम नियोजन करून मुलांना स्वदेशी खेळ जाणून घेऊन खेळण्याची / शिकण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालक व उपस्थित नागरिक समाधान व्यक्त करीत होते. हे खेळ बघण्यासाठी व खेळण्यासाठी एक हजारावर नागरिकांनी या खेळ महा कुंभाला भेट दिल्याचे आयोजकांनी ( Chikhli ) सांगितले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.