Pimpri : मराठा सेवा संघाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अभिवादन

एमपीसी न्यूज – मराठा सेवा संघाच्या वतीने पिंपरी येथील भारतरत्न व राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ( Pimpri) प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या वेळी मराठा सेवा संघाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष ॲड. लक्ष्मण रानवडे ,सचिव सचिन दाभाडे , सुनिल रानवडे , राजू आवळे , दादाभाऊ अल्हाट , तुकाराम बोडके , वैभव वाघमारे , अथर्व कांबळे, विनायक घाडगे , दिलीप वाघ व छत्रपती शिवाजी महाराज मुस्लीम ब्रिगेडचे कार्यकर्ते चांदभाई शेख व जमिल शेख वगैरे कार्यकर्ते उपस्थित होते.

Talegaon : बोलताना अथवा लिहिताना भाषेचा आणि व्याकरणाचा अभ्यास असणे आवश्यक आहे – वैभव जोशी

या वेळी ॲड. लक्ष्मण रानवडे  म्हणाले  , स्वातंत्र्या नंतरच्या 75 वर्षात भारतीय राज्य घटनेच्या व घटना दुरुस्त्यांचा जो अर्थ लावून राज्य कार्यभार करण्यात आला तो या वेळच्या 2024 च्या लोकसभा निवडणुकी नंतर तोच अर्थ राहील की, नव्याने घटना दुरुस्त्या करून त्याचा वेगळा अर्थ बहुमताच्या जोरावर लावला जाईल याचा अत्यंत महत्वपुर्ण निकाल या निवडणुकीत लागणार आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.