Talegaon : बोलताना अथवा लिहिताना भाषेचा आणि व्याकरणाचा अभ्यास असणे आवश्यक आहे – वैभव जोशी

एमपीसी न्यूज – देखणे सोहळे अनेक अनेक पाहिले पण हृदय सोहळा हा अनुभवतो ( Talegaon ) आहे. झगमगाटापेक्षा आपुलकी, कलेवर प्रेम आणि जिव्हाळा अनुभवल्यानी ही संध्याकाळ दीर्घकाळ मनात रुंजी घालेल.” असे मत प्रसिद्ध कवी, गीतकार वैभव जोशी यांनी व्यक्त केले.  वैभव जोशी यांची प्रकट मुलाखत कलापिनीच्या डॉ. शं. वा. परांजपे नाट्यसंकुलात पार पडली. निमित्त होते कलापिनीच्या 47 व्या वर्धापन दिनाचे.

या दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच नटराजपूजन झाले. दिनेश कुलकर्णी यांनी लिहिलेल्या आणि संपदा थिटे यांनी संगीतबद्ध केलेल्या कलापिनीगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्राची गुप्ते, चांदणी पांडे, डॉ. प्राची पांडे, निधी पारेख यांनी गीत सादर केले. त्यानंतर नृत्यांगना किर्ती ढेंबे यांनी वैभव जोशी यांच्या गाजलेल्या गीतांवर बहारदार नृत्य सादर केले. यामध्ये उर्मिला भोंडवे, स्नेहल दिघे, आर्या पंडित, प्राजक्ता तावडे, अनन्या ठाकूर देसाई, सई मोडक या कलाकारांचा सहभाग होता.

Salman Khan : सलमान खानच्या घरावरील गोळीबाराचे धागेदोरे कॅनडापर्यंत

कलापिनीचे अध्यक्ष विनायक अभ्यंकर यांनी स्वागत केले. 47 वर्षातील संस्थेची प्रगती आणि पुढे जात असलेल्या कलापिनी नाट्यसंकुलाच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडला आणि कलापिनीच्या नाट्यगृहाचा गौरव केला. डॉ अनंत परांजपे यांनी प्रास्ताविक केले. गेली अनेक वर्ष कार्यकर्ते आणि रसिक प्रेक्षकांनी चालवलेली ही नाट्य चळवळ यापुढे अशीच जोमाने चालू राहील, असे ( Talegaon ) ते म्हणाले.

त्यानंतर कलापिनी पुरस्कारांचे जोशी यांच्या हस्ते वितरण झाले. छाया हिंगमिरे, किशोर कसबी, सुमेर नंदेश्वर, हितेश शिंदे, योगेश शिंदे, अर्जुन गायकवाड, अक्षय गायकवाड, मंगेश चव्हाण, रणजित पाबळ, कीर्ती ढेंबे यांचा सत्कार करण्यात आला.

बाल भवन सितारा – स्वरा वालझडे, देवांश चौधरी . कुमार भवन सितारा- अन्वय धोपाटे, मनवा वैद्य. कै.पुष्पलता अरोरा स्मृती पुरस्कार – विशाखा देशमुख, कलापिनी हास्य योग विशेष गौरव पुरस्कार – रश्मी पांढरे, मोरेश्वर होनप. कै.सुनीता घाणेकर स्मृती कला गौरव पुरस्कार – केतकी लिमये. कै.सौ. गोदावरी भाभी व कै. विष्णू भाई शहा “सेवाभावी कार्यकर्ता” पुरस्कार रामचंद्र रानडे आणि सुनीता रानडे यांना देण्यात आला.

त्यानंतर वैभव जोशी यांची डॉ विनया केसकर आणि विराज सवाई यांनी खुमासदार मुलाखत घेतली. या मुलाखतीला रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. श्रोतृवर्गाने सातत्याने दिलेल्या  प्रतिसादामुळे कार्यक्रमात रंगत आणली. विशेषतः वैभव जोशींनी सादर केलेल्या कवितांना मिळालेला प्रतिसाद वाखाणण्यासारखा ( Talegaon ) होता.

 

वैभव जोशी यांनी सांगितले,  बोलताना अथवा लिहिताना भाषेचा आणि व्याकरणाचा अभ्यास असणे आवश्यक आहे. कविता हे माध्यम म्हणजे फापट पसारा त्याच्यात असता कामा नये तर मुद्देसूद असेल तर ते ऐकणाऱ्याला भिडतं. आपण आपल्याला भिडणाऱ्या, जाणवणाऱ्या, आपल्या आतून आलेल्या भावनांना आपण जर शब्दबद्ध केलं तर ते अधिक प्रभावी ठरतं. कविता सादर करताना आपल्या डोळ्यातून आलेला एक अश्रू हा समोरच्यालाही जाणवतो आणि नकळतपणे त्याच्या भावना सुद्धा आपल्या भावनांमध्ये मिश्रित होऊन एक फार सुरेल संगम तयार होतो. आपल्याला आपल्या भावना शब्दात मांडता येण्यासाठी मुळात आपण त्याच्यावर विचार करण्याची गरज आहे.

लीना परगी  आणि कार्याध्यक्षा अंजली सहस्त्रबुद्धे यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष अशोक बकरे यांनी अहवाल वाचन केले. सहसचिव विनायक भालेराव यांनी आभार मानले. चैतन्य जोशी, सुप्रिया खानोलकर, शामली देशमुख यांनी विशेष सहकार्य केले. या सोहळ्यात कलापिनीच्या विविध कार्यक्रमांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन मीनाक्षी झेंडे, हेमंत झेंडे, अरुंधती देशपांडे आणि सहकाऱ्यांनी सुबक रित्या मांडले होते. स्वछंद आणि अभिलाष भवार यांनी प्रकाश योजना केली. मनीषा शिंदे आणि नीता धोपाटे यांनी सुंदर अशी रांगोळी रेखाटली होती. मधुवंती रानडे, ज्योती ढमाले, भाग्यश्री हरहरे, ऋचा पोंक्षे, रुपाली पाटणकर, दिपाली जोशी, उमा भालेराव आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

 

https://www.youtube.com/shorts/5IMItG9kbmY

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.