Nigdi : शिक्षण प्रसारक मंडळीच्या शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमीत्त अभिवादन

एमपीसी न्यूज – निगडीतील यमुनानगर येथील शि.प्र.मंडळी च्या शाळेत ( Nigdi) रविवारी (दि.14) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

शाळेतील सर्व मुख्याध्यापकांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले . शाळेतील शिक्षिका साक्षी सांगळे यांनी  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून  त्यांचे विचार, तत्व, त्यांचा जीवन संघर्ष आणि त्यांनी समाजासाठी केलेली कामगिरी याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.

PCMC : शहरातील 17 चाैकात बसवलेले एअर प्युरिफिकेशन फाउंटन धूळखात

शाळा समिती अध्यक्ष ॲड. दामोदरजी भंडारी यांच्या संकल्पनेतून तसेच मा.मुख्याध्यापिका ज्योती बक्षी, लीना वर्तक, उमा घोळे, मा.मुख्याध्यापक रविंद्र मुंगसे, मा.मुख्याध्यापिका सविता बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर सहकारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम साजरा करण्यात आला.

शिक्षिका स्नेहल देशपांडे  यांनी प्रार्थना गायली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा जोशी ( Nigdi) यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.