Pune : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी पुण्यात 1 लाख नागरिकांना मोफत ताक वाटप

एमपीसी न्यूज –  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकसहभागातूनच मोठी क्रांती ( Pune ) घडवली, त्यामुळे त्यांच्या जयंतीदिनी पुणेकरांनी एकत्र येत तब्बल 1 लाख नागरिकांकरिता ताक तयार करून वाटप केले. क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने आयोजित उपक्रमात ‘दहा हजार किलोची मिसळ’ देखील नागरिकांना मोफत देण्यात आली.

क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने पुणे रेल्वे स्टेशनजवळील डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ 10 हजार किलो मिसळ व 1 लाख नागरिकांना मोफत ताक वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल 15 बाय 15 फूट आणि  6.5 फूट उंच अशा तब्बल 2500 किलो वजनाच्या भव्य कढईमध्ये मिसळ व त्यापेक्षा लहान कढईमध्ये ताक तयार करण्यात आले. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांसह सहका-यांनी ही मिसळ व ताक तयार केले.

Nigdi : शिक्षण प्रसारक मंडळीच्या शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमीत्त अभिवादन

यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या उपक्रमाला भेट देत एकत्रितपणे मिसळीचा आस्वादही ( Pune ) घेतला. महेंद्र मारणे, विलास कसबे, संतोष पंडीत, बाळासाहेब रुणवाल, एकनाथ ढोले, संदेश काथवटे, सचिन विप्र, रवि गुडमेटी, राम तोरकडी, शेखर काळे, रुपेश चांदेकर, श्रीधर चव्हाण, प्रल्हाद गवळी, यशोदीप सोनवणे आदींनी आयोजनात सहभाग घेतला. ताकासाठी 1 हजार किलो दही वापरण्यात आले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर जयंतीदिनी पुण्यात 1 लाख नागरिकांना मोफत ताक

एमपीसी न्यूज –  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकसहभागातूनच मोठी क्रांती घडवली, त्यामुळे त्यांच्या जयंतीदिनी पुणेकरांनी एकत्र येत तब्बल 1 लाख नागरिकांकरिता ताक तयार करून वाटप केले. क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने आयोजित उपक्रमात ‘दहा हजार किलोची मिसळ’ देखील नागरिकांना मोफत देण्यात आली.

क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने पुणे रेल्वे स्टेशनजवळील डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ 10 हजार किलो मिसळ व 1 लाख नागरिकांना मोफत ताक वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल 15 बाय 15 फूट आणि  6.5 फूट उंच अशा तब्बल 2500 किलो वजनाच्या भव्य कढईमध्ये मिसळ व त्यापेक्षा लहान कढईमध्ये ताक तयार करण्यात आले. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांसह सहका-यांनी ही मिसळ व ताक तयार केले.

यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या उपक्रमाला भेट देत एकत्रितपणे मिसळीचा आस्वादही घेतला. महेंद्र मारणे, विलास कसबे, संतोष पंडीत, बाळासाहेब रुणवाल, एकनाथ ढोले, संदेश काथवटे, सचिन विप्र, रवि गुडमेटी, राम तोरकडी, शेखर काळे, रुपेश चांदेकर, श्रीधर चव्हाण, प्रल्हाद गवळी, यशोदीप सोनवणे आदींनी आयोजनात सहभाग घेतला. ताकासाठी 1 हजार किलो दही वापरण्यात ( Pune ) आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.