Pune : काँग्रेस नेते आबा बागुल देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी नागपुरात

 एमपीसी न्यूज – पुण्यात काँग्रेसने आमदार  रवींद्र धंगेकरांना उमेदवारी दिल्याने नाराज ( Pune)  झालेल्या  माजी उपमहापौर आबा बागुल यांनी नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आबा बागुल यांनी भाजपा नेत्यांची भेट घेतल्यानं ते भाजपात प्रवेश करणार का अशी चर्चा सुरु झाली आहे.

Pune : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी पुण्यात 1 लाख नागरिकांना मोफत ताक वाटप

 

काँग्रेसनं धंगेकरांनी उमेदवारी दिल्यानं आबा बागुल नाराज होते. त्यांनी पुण्यातील काँग्रेस पक्ष कार्यालयासमोर आंदोलनही केले होते. तेव्हापासून आबा बागुल भाजपा नेत्यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात होते. सध्या बागुल हे फडणवीस-बावनकुळे यांच्या भेटीला नागपूरमध्ये  पोहचले आहेत. पुण्याची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर निष्ठावंत लोकांना धक्का बसला आहे. त्यांना न्याय मिळेल ही अपेक्षा आहे. खरंतर ही निष्ठावंत लोकांची हत्या म्हणायला पाहिजे. 40 वर्ष काम करणाऱ्यांना तिकीट दिलं नाही. आता आलेले आमदार त्यांना तिकीट दिल गेलं , असे आबा बागुल यांचे म्हणणे ( Pune)  होते. आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आबा बागुल भाजपात प्रवेश करणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.