Pune : निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर असणाऱ्या त्या 5 हजार कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातील लोकसभा मतदार संघाच्या ( Pune ) निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शासकीय कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामकाजाचे सोमवारी (दि.15) प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणासाठी तब्बल 5 हजार कर्मचारी हे गैरहजर होते. या गैरहजर कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली.

Lonavala : श्रीरामनवमी, महाविर जयंती, हनुमान जयंती दिवशी शहरातील मांस विक्री दुकानं बंद ठेवण्याची मागणी

जिल्ह्यात पुणे, बारामती, शिरूर आणि बारामती असे चार लोकसभा मतदारसंघ आहेत. निवडणूक कामकाजासाठी 71 हजार अधिकारी, कर्मचारी आवश्यक आहेत. या कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण सोमवारी पार पडले. या प्रशिक्षणाला सुमारे दहा टक्के कर्मचारी गैरहजर असल्याचे निदर्शनास आले आहे. काही कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाजाचे दोन आदेश मिळाले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबतची शहानिशा करून उर्वरित गैरहजार कर्मचाऱ्यांना नोटीस काढण्यात येणार आहे.

काही शासकीय खात्यांमध्ये 40 टक्के महिला कर्मचारी आहेत. महिलांना त्यांच्या मतदारसंघात निवडणूक कामकाज देण्यात येईल. तसेच एका महिलेसोबत दुसरी महिला कर्मचारी जोडीला देण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी पत्रकार परिषदेत ( Pune ) सांगितले.

 

Pune : बोगस बियाणे, खते, बोगस किटकनाशकांवर प्रशासनाची करडी नजर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.