Bhavesh Bhandari : अबब! 200 कोटींची संपत्ती दान करून घेतले वैराग्य

प्रसिद्ध व्यवसायिक भावेश भंडारी आणि त्यांच्या पत्नीचे जैन धर्मासाठी मोठे पाऊल

एमपीसी न्यूज – गुजरात मधील साबरकांठा जिल्ह्यातील हिम्मतनगरचे रहिवासी ( Bhavesh Bhandari ) आणि प्रसिद्ध व्यवसायिक भावेश भंडारी आणि त्यांच्या पत्नीने आपली 200 कोटींची संपत्ती दान करत वैराग्य पत्करण्याचा निर्णय घेतला. आलिशान जगणे त्यागून जैन धर्माची त्यांनी दीक्षा घेतली.

भावेश भंडारी बांधकाम व्यवसाय क्षेत्राशी निगडित आहेत. त्यांचा व्यवसाय साबरकांठा ते अहमदाबाद पर्यंत विस्तारलेला आहे. आलिशान जगण्याचा त्याग करून भंडारी दांपत्याने वैरागी जीवन जगण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासह 35 जण 22 एप्रिल रोजी हिम्मतनगर रिवर फ्रंट येथे जैन धर्माच्या आचरणानुसार जगण्याचा संकल्प करणार आहेत.

Pune : निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर असणाऱ्या त्या 5 हजार कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार

भंडारी परिवाराला कायम जैन समाजाबद्दल आस्था होती. त्यामुळे त्यांचा सातत्याने जैन समाजाच्या दिक्षार्थी आणि मार्गदर्शकांशी चर्चा होत असे. वैराग्य घेतल्यानंतर भंडारी दाम्पत्याला भिक्षा मागून जगावे लागणार आहे. त्यांना पंखा, एसी, मोबाईल फोन अशा भौतिक सुखांचाही त्याग करावा लागणार आहे. त्याचबरोबर त्यांना प्रत्येक ठिकाणी पायी चालत जावे लागणार आहे.

शोभायात्रेत दान केली संपत्ती

वैरागी बनणाऱ्या भावेश भंडारी आणि त्यांच्या पत्नीची हिम्मतनगर मध्ये जल्लोषात शोभायात्रा काढण्यात आली. सुमारे चार किलोमीटर लांब असलेल्या या शोभायात्रेत भंडारी दांपत्याने आपली 200 कोटी रुपयांची संपत्ती दान केली.

मुलांपासून मिळाली प्रेरणा

सन्यास घेणाऱ्या भंडारी दाम्पत्याला 16 वर्षांचा मुलगा आणि 19 वर्षांची मुलगी आहे. त्यांनी यापूर्वीच सन्यासी जीवन जगण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन भंडारी दांपत्याने सन्यास घेण्याचा निर्णय घेतला ( Bhavesh Bhandari ) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.