Lonavala : श्रीरामनवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती दिवशी शहरातील मांस विक्री दुकानं बंद ठेवण्याची मागणी

एमपीसी न्यूज – येत्‍या आठ दिवसांत श्रीरामनवमी, महाविर जयंती, हनुमान जयंती ( Lonavala) आहेत. या सणाच्या दिवशी राज्यशासन परिपत्रका प्रमाणे लोणावळा विभागातील मटण, मांस, कत्तलखाने व इतर मांस विक्री दुकाने बंद ठेवण्यात यावीत, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या मावळ तालुका अध्यात्मिक आघाडीच्या वतीने लोणावळा नगरपरिषदेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी सुनील महाराज वरघडे, नंदकुमार महाराज शेटे, भाजपचे लोणावळा शहर अध्यक्ष अरुण लाड, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, माजी नगरसेवक ललित सिसोदिया, सुनील गायकवाड, बाबू संपत यांच्यासह जैन समाजाचे काही प्रतिनिधी उपस्थित होते.

Pune : बोगस बियाणे, खते, बोगस किटकनाशकांवर प्रशासनाची करडी नजर

श्रीरामनवमी, महाविर जयंती, हनुमान जयंती हे हिंदुधर्मातील पवित्र सण असून हे तीन ही सण आठ दिवसाच्या अंतरात येत आहेत. त्यापार्श्वभूमीवर शासकीय परिपत्रकाच्या आधारे लोणावळा नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ मटण, मांस, कत्तलखाने व इतर मांस विक्री दुकाने वरील तीन ही दिवस बंद ठेवावेत, अशा स्वरूपाचे लेखी निवेदन लोणावळा नगरपरिषदेला देण्यात आले आहे. नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी शरद कुलकर्णी यांनी हे निवेदन स्वीकारले ( Lonavala) आहे.

Maval : मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.