Maval : मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचा सहावा वर्धापनदिन नुकताच ( Maval) मावळ तालुक्यातील श्री साईबाबा सेवाधाम, कान्हे फाटा येथे अनेक उपक्रमाने उत्साहात संपन्न झाला. यावेळी अहवाल प्रकाशन,वार्षिक सर्वसाधारण सभा व मावळ रत्न पुस्कारांचे वितरण करण्यात आले. निष्ठावंत वारकरी म्हणून हभप वाघूजी राघू पाठारे, किर्तनकार हभप भागुजी महाराज करांडे, मृदंगाचार्य हभप गणपत विष्णू सुतार, सामाजिक कार्य सदाशिव गाडे,सामाजिक कार्यर राजाराम खंडू गायकवाड यांना मावळरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे,राजस्थान वारकरी सांप्रदायाचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. श्रीमंत रमेशसिंह व्यास, स्वामी निरंजनानंद सरस्वती महाराज,रविंद्रआप्पा भेगडे, बाळासाहेब नेवाळे,माऊली शिंदे, राजाराम शिंदे,नामदेव कोंडे,शांताराम कदम, शिवाजी पवार,डॉ. विकेश मुथा, या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करून या कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी मंडळाचे संघटक ह.भ.प. गोपिचंद महाराज कचरे यांची प्रवचन सेवा संपन्न झाली. त्यानंतर मंडळाच्या वतीने निष्ठावंत वारकरी म्हणून ह.भ.प. वाघूजी राघू पाठारे, ह.भ.प.भागुजी महाराज करांडे ( किर्तनकार), ह.भ.प. गणपत विष्णू सुतार( मृदंगाचार्य), सदाशिवआण्णा गाडे( सामाजिक कार्य),राजाराम खंडू गायकवाड( सामाजिक कार्य) यांना मावळरत्न पुरस्काराने मानपत्र व सन्मानचिन्ह देवून प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

Railway : कामशेत- तळेगाव दरम्यानचे रेल्वे फाटक दुरुस्तीच्या कामासाठी दोन दिवस बंद

त्यानंतर मंडळाच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन व वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. याप्रसंगी मा.खा.श्रीरंग  बारणे ( Maval)यांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. नंदकुमार महाराज भसे यांनी मंडळाच्या कार्याचा आढावा यावेळी दिला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे कोषाध्यक्ष बजरंग घारे, वारकरी सेवा समितीचे अध्यक्ष देवराम सातकर,प्रवक्ते सुनिल महाराज वरघडे,संघटक गोपिचंद महाराज कचरे, महादुबुवा नवघणे, भरत येवले, जेष्ठ किर्तनकार नाथा महाराज शेलार, सुभाष महाराज पडवळ,बळवंत येवले, कोषाध्यक्ष नितीन आडिवळे, नाणे मावळ विभागीय अध्यक्ष शांताराम गायखे,आंदर मावळ विभागीय अध्यक्ष दिपक रावजी वारिंगे, पवन मावळ विभागीय अध्यक्ष राोहिदास घारे, कामशेत शहर अध्यक्ष शंकर खेंगले, लोणावळा शहर अध्यक्ष बाळासाहेब पाठारे, वडगाव शहर अध्यक्ष दत्तात्रय टेमगिरे, लक्ष्मण ठाकर, मंडळाचे विभाग प्रमुख शिवाजी बोडके, निलेश शेेटे, संजय महाराज बांदल, बाळासाहेब राजिवडे,  सुखदेव गवारी, दशरथ सावंत, पंढरीनाथ वायकर, सदाशिव पेटकर, दत्ताभाऊ ठाकर, राजाराम असवले, काशिनाथ सातकर, बंडू कदम, भाऊसाहेब मापारी, रवि ठाकर, सज्जन महाराज दांगट, भिवाजी गायखे, प्रकाश गाडे, राजाराम विकारी,रोहिदास खांडेभराड, गोविंद सावले, वारकरी सेवा समितीचे गुलाब बधाले, विजय अरूण शेटे, बळीराम नवघणे,मारूती देवकर, संपर्कप्रमुख संतोष शेलार,सखाराम घनवट पाटील, चंद्रकांत रामभाऊ सातकर, बाळासाहेब देशमुख,दशरथ काळे, क्रियाशील सदस्य ह.भ.प. बाळासाहेब वारिंगे,श्रीरंग वायकर, शंकर शेटे, निखिल काकडे, पांडुरंग मोरमारे, साईनाथ राऊत, नामदेव खांडभोर, नानासाहेब घोजगे,योगेश चोपडे, बालवारकरी समितीचे अध्यक्ष रोहिदास जगदाळे,शांताराम लोहर, विजय लालगुडे,मोहन कदम, दत्तात्रय चोपडे,पत्रकार मच्छिंद्र मांडेकर, दशरथ भोसले, पांडुरंग जाचक,मदन कचरे, आदींनी विशेष प्रयत्न केले.

प्रास्ताविक मंडळाचे सचिव ह.भ.प. रामदास पडवळ यांनी केले. सर्वांचे स्वागत कार्याध्यक्ष संतोष कुंभार यांनी केले तर सूत्रसंचालन उपाध्यक्ष दिलीप वावरे यांनी केले. अहवालाचे वाचन कायदेशिर सल्लागार ॲड सागर शेटे यांनी केले व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता ( Maval) झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.