Pune Lonavala Local : पुणे लोणावळा मार्गावर मेगाब्लॉक; चार लोकल रद्द 

एमपीसी न्यूज – मध्य रेल्वेच्या पुणे विभागा द्वारे पुणे-लोणावळा सेक्शनवर  (Pune Lonavala Local)इंजीनियरिंग आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांकरीता रविवारी (दिनांक 21) मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे पुणे लोणावळा दरम्यान धावणाऱ्या चार लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.
पुणे – लोणावळा दरम्यान रद्द लोकल

 

Pune: काँग्रेसने मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात दाखल केली आचारसंहिता भंगची तक्रार

पुण्याहून लोणावळासाठी सकाळी 11.17 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01564 रद्द राहील.
पुण्याहून लोणावळासाठी दुपारी 3.00 वाजता सुटणारी (Pune Lonavala Local) लोकल क्रमांक 01566 रद्द राहील.
लोणावळा – पुणे दरम्यान रद्द लोकल
लोणावळ्याहून पुणेसाठी दुपारी 2.50 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01561 रद्द राहील.
लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता सायंकाळी 5.30 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01565 रद्द राहील.
याव्यतिरिक्त शिवाजीनगर वरून सायंकाळी 7.10 वाजता सुटणारी शिवाजीनगर – लोणावळा लोकल संख्या 01574
शिवाजीनगर ऐवजी पुणे येथून सायंकाळी 7.00 वाजता सुटेल.
https://www.youtube.com/shorts/BfMxAD_2g9E

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.