Pune: काँग्रेसने मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात दाखल केली आचारसंहिता भंगची तक्रार

एमपीसी न्यूज – पुणे लोकसभा निवडणुकीसाठी तिरंगी लढत होत आहे. काँग्रेसचे उमेदवार(Pune) रवींद्र धंगेकर, भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि वंचित आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांच्यात ही लढत होत आहे.

भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात काँग्रेसनेआचारसंहिता भंगची तक्रार दाखल केली (Pune)आहे. एका जाहिरातीसंदर्भात तक्रार दिली आहे. ‘राम मंदिर झालं आता राष्ट्र मंदिर बनवूया’ अशी मोहोळ यांनी जाहिरात दिली होती. त्याला काँग्रेसने आक्षेप घेतला आहे.

Pimpri: 3 वर्षापासून फरार आरोपीला बेड्या,गुन्हे शाखेची कारवाई

‘राम मंदिर झालं आता राष्ट्र मंदिर बनवूया’ ही जाहिरात धार्मिक प्रलोभण दाखवणारी असल्याचे काँग्रेसन म्हटल आहे. जाहिरातीच्या माध्यमातून मुरलीधर मोहोळ यांनी धार्मिक प्रलोभन दाखवल्याचा आरोप काँग्रेसने आहे. पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात काँग्रेसकडून आचारसंहिता भंगाची तक्रार केली आहे. मुरलीधर मोहोळ यांनी वर्तमानपत्रातून ही जाहिरात दिली होती. या जाहिरातीवरून काँग्रेसने आक्षेप घेत आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली.

काँग्रेस नेते मोहन जोशी म्हणाले की, भाजपने राम मंदिराला निवडणूक प्रचाराचा मुद्दा बनवला. राम मंदिरच्या माध्यमातून धार्मिक प्रलोभन भाजपकडून दाखवले जात आहे.मुरलीधर मोहोळ यांनी मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आचार संहिता भंगची तक्रार दिली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.