Hadapsar : पत्र्याच्या खोलीत झोपलेल्या सात कामगारांचे मोबाईल लंपास

एमपीसी न्यूज : दिवसभर काम (Hadapsar) करून पत्र्याच्या खोलीत झोपलेल्या सात कामगारांचे मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेले. हडपसर येथील गरड मळा परिसरातून ही घटना घडली. याप्रकरणी बापू रामचंद्र साळुंखे (वय 37) यांनी तक्रार दिली असून अज्ञात व्यक्ती विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Rotary Club : ‘रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन’च्या पुरस्कारांचे 15 जानेवारी रोजी वितरण

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे त्यांच्या साथीदारांसह हडपसर परिसरातील गरड मळ्यात पत्र्याच्या खोलीत राहत होते. 10 जानेवारीच्या रात्री गाढ झोपेत (Hadapsar) असताना दरवाज्याचा बाजूचा पत्रा कापून अज्ञात व्यक्ती त्यांच्या खोलीत शिरला. आणि गाढ झोप येत असणाऱ्या सात जणांचे मोबाईल हँडसेट त्याने चोरून नेले. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.