Khed : उसने दिलेले पैसे परत मागितल्याने दोघांना मारहाण

एमपीसी न्यूज – उसने दिलेले पैसे परत मागण्यासाठी (Khed) गेलेल्या दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवारी (दि. 2) रात्री अकरा वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील साबळेवाडी येथील अंबिका उर्फ त्रिमूर्ती कला केंद्र येथे घडली.

सिकंदर वजीरसाहब दर्गा (वय 37, रा. कात्रज) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन ते तीन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Alandi : श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील स्काऊट – गाईड विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

पोलिसांनी दिलेले माहितीनुसार, फिर्यादी सिकंदर यांनी आरोपीला कामानिमित्त पैसे दिले होते. ते पैसे मागण्यासाठी फिर्यादी गेले असता आरोपीने ‘तुला पैसे देणार नाही तुला काय करायचे ते कर’ असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या मित्राला लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.