Hinjewadi: नोकरीचे आमिष दाखवून तरुणीची 2 लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज –  बनावट ऑफर लेटर देत तरुणीला चार लाख रुपयांचे पॅकेज (Hinjewadi)देण्याचे आमिष दाखवून 2 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. ही फसवणूक जानेवारी 2024 ते मे 2024 या कालावधीत हिंजवडी येथे झाली आहे.

याप्रकरणी  25 वर्षीय तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून(Hinjewadi) प्रदिप उर्फ विक्रांत राजू भोसले (रा. आळंदी) व परेश देविदास पाटील (रा. चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Loksabha Election : मतदान केंद्रांच्या 100 मीटर परिसरातील आस्थापना सुरु ठेवण्यास मनाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना बेक्सीस प्रा.लि. कंपनीत नोकरी लावण्याचे आरोपीने आमिष दाखवले. यावेळी त्यांना वार्षिक 4 लाख रुपयांचे पॅकेज देणार असल्याचे सांगितले. यासाठी फिर्यादींना बनावट ऑफर लेटर देखील देण्यात आले. फिर्यादीकडून नोकरी लावण्यासाठी  2 लाख रुपये घेत त्यांची फसवणूक केली. यावरून हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.