Pimpri : भाजपला शरद पवार यांची धास्ती – रोहित पवार

एमपीसी न्यूज – विरोधी पक्षातील कोणत्याही मोठ्या (Pimpri) नेत्याला  महाराष्ट्रात आल्यावर बातमी होण्यासाठी शरद पवार यांच्यावर बोलावे लागते. त्यामुळे ते बोलतात. ती प्रथा भाजपचे लोक पाळत आहेत. महाराष्ट्रात येणारे भाजपचे प्रत्येक नेते पवार साहेबांवर बोलतात. त्यामुळे भाजपने पवार साहेबांची धास्ती घेतल्याचे सिद्ध होते, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.

पिंपरीत बोलताना आमदार पवार म्हणाले की, लोकशाही टिकवण्यासाठी भाजपच्या विरोधात भूमिका घेतली पाहिजे. तिन्ही पक्षामध्ये जागांचे वाटप झाले आहे. वंचित बहुजन आघाडी सोबत चर्चा करून लवकरच जागा वाटप केले जाईल. सर्व पक्ष एकत्रित येतील. दोन दिवसात निर्णय होईल. मतांची विभागणी होऊन भाजपला फायदा होऊ नये याबाबत सर्वांचे एकमत झाले आहे. त्यामुळे एक, दोन जागा कमी मिळाल्या तरी चालतील. जिथे एखाद्या पक्षाची ताकद आहे, उमेदवार चांगला आहे. तिथे एक-दोन पाऊले मागे येण्याची तयारी आहे. भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष एक पाऊल मागे येण्यास तयार आहेत.

अनेक आमदार दबावामुळे अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. लोकसभेनंतर अंदाज येईल. तिकडे गेलेले अनेक आमदार पोस्टरवर शरद पवार यांचा फोटो वापरतात. भाजपमध्ये गेलो पाहिजे असा एक गट अजित पवार यांच्या पक्षात झाला (Pimpri) आहे. अजित पवार यांच्या पक्षात दोन गट झाले आहेत. काहीजण भाजपच्या कमळावर विधानसभा निवडणूक लढवू असे म्हणत आहेत. तर, काहीजण शरद पवार यांच्याकडे पुन्हा जाऊ असे म्हणतात. आम्ही भाजपच्या विरोधात लढत आहोत. लोकांना विश्वासात घेऊन, कार्यकर्त्यांच्या हिमतीवर लोकसभा, विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहोत, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.