Vadgaon Maval : वडगाव येथे भाजपच्या वतीने नारीशक्ती वंदन कार्यक्रमाचे आयोजन

एमपीसी न्यूज – मावळ तालुका भाजपच्या वतीने वडगाव (Vadgaon Maval) येथे नारी शक्ती वंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला सक्षमीकरण आणि देशाच्या प्रगतीमध्ये महिलांचा वाढता सहभाग याबाबत महिलांना मार्गदर्शन केले. भाजपचे मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

याप्रसंगी मावळ तालुका भाजपा अध्यक्ष दत्तात्रय गुंड,जिल्हा उपाध्यक्ष रामदास गाडे,प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले,जिल्हा ओबीसी सेल अध्यक्ष दत्तात्रय माळी,वडगाव भाजपा अध्यक्ष अनंता कुडे,नगरसेवक रविंद्र म्हाळस्कर, वडगाव शहर भाजप युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे,मा.सरपंच संभाजी म्हाळसकर,भाजपा सरचिटणीस राणी म्हाळसकर, उपाध्यक्ष संजना  सातकर,जिल्हा सरचिटणी सविता  गावडे,महिला आघाडी सरचिटणीस वैशाली  ढोरे,महिला आघाडी सरचिटणीस आरती  भालवणे,नगरसेविका सुनिता भिलारे,वडगाव महिला अध्यक्षा धनश्री भोंडवे यांच्यासह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Maval : भाजपची लाभार्थी संपर्क अभियान कार्यशाळा संपन्न   

देशाचे लोकप्रिय यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (Vadgaon Maval) ‘नारी शक्ती वंदन’ कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातील महिला भगिनिंशी संवाद साधून मार्गदर्शन केले. भाजपा मावळ सरचिटणीस राणी  म्हाळसकर व महिला मोर्चा आयोजित आज वडगाव मावळ येथे नारी शक्ती वंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम महिला भगिनींना थेट लाईव्ह पाहता यावा यासाठी रविंद्र आप्पा भेगडे यांच्या वतीने विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी महिला सक्षमीकरण आणि देशाच्या प्रगतीमध्ये महिलांचा वाढणारा सहभाग याबाबत महिलांना मार्गदर्शन केले.तर रविंद्र आप्पा भेगडे यांनी उपस्थित महिला भगिनींना नारी शक्ती वंदन अधिनियम अंतर्गत देशभरातील महिला भगिनींना संसदेत व विधानसभेत 33% जागा आरक्षित ठेवण्याचा निर्णय मोदी साहेबांनी घेतला असल्याची माहिती यावेळी बोलताना दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.