Today’s Horoscope 07 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 07 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – गुरुवार.

तारीख – 07.03.2024.

शुभाशुभ विचार – शुभ दिवस.

आज विशेष – भागवत एकादशी.

राहू काळ – दुपारी 01.30 ते 03.00.

दिशा शूल – दक्षिणेस असेल.

आज नक्षत्र – उत्तरा शाढा 13.03 पर्यंत नंतर श्रवण.

चंद्र राशी – मकर.

—————————–

मेष – ( शुभ रंग – मरून)

वेळीच घेतलेले योग्य निर्णय व वेळेचे योग्य नियोजन या आधारे कार्यक्षेत्रात यशाची कमान चढती ठेवता येईल. आज मित्रांनी दिलेले सल्ले फार मनावर घेऊ नका.

वृषभ ( शुभ रंग- डाळिंबी)

सहज काही मिळाले नाही तरीही आज तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना दैवाचे पाठबळ नक्कीच मिळेल. सज्जनांचे पाय घराला लागतील. वडीलधाऱ्यांना मात्र दुखावू नका.

मिथुन – ( शुभ रंग- हिरवा)

कार्यक्षेत्रात सतत सावधानता बाळगायला हवी. काही चुकीची माणसे संपर्कात येऊ शकतात. कमी श्रमात जास्त लाभाचा मोह टाळा. आज कोणतेही धाडस करू नका. नाकासमोर चाला.

कर्क – (शुभ रंग – पिस्ता)

कौटुंबिक सदस्यात सामंजस्य राहील. जोडीदाराला अभिमानास्पद वाटणारी कामगिरी तुमच्या हातून होईल. व्यवसायातील स्पर्धेचा सामना यशस्वीपणे कराल.

सिंह -( शुभ रंग – क्रीम )

नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. हितशत्रूंचा उपद्रव चालूच राहणार आहे. कामात चूक होणार नाही याची दक्षता घ्या. आज तब्येत थोडी नरमच असेल.

कन्या – ( शुभ रंग- गुलाबी)

काही रसिक व हौशी मंडळी कामावर दांडी मारूनही मौजमजेस प्राधान्य देतील. स्वतःचे लाड पुरवण्यासाठी खर्च कराल. कलाकारांना विविध संधी चालून येतील.

तूळ – ( शुभ रंग- पांढरा)

कौटुंबिक सदस्यांत सुसंवाद असेल. मुलांची शाळेतील कामगिरी कौतुकास्पद राहील. पूर्वी हरवलेली एखादी वस्तू आज तुम्हाला घरातच सापडण्याची शक्यता आहे.

वृश्चिक – ( शुभरंग – जांभळा)

आज घराबाहेर वावरताना रागीट स्वभावावर नियंत्रण असू द्या. व्यर्थ वाद टाळा. एखाद्या अडचणीच्या प्रसंगी शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. अहंकार सोडूनच द्या.

धनु – (शुभ रंग- आकाशी)

उद्योग व्यवसायात मिळकत उत्तम असल्याने आज तुमचे मनोबलही उत्तम असेल. कार्यक्षेत्रात प्रभावी नेतृत्व कराल. तुमचा उत्साह पाहून विरोधकही प्रभावीत होतील.

मकर – (शुभ रंग- सोनेरी)

आज तुम्ही जिथे जाल तिथे आपलीच मर्जी चालवण्याचा प्रयत्न कराल महत्त्वाच्या चर्चेत आपले मत मांडण्याची घाई न करता इतरांचेही विचार ऐकून घ्या कायदा अजिबात मोडू नका .

कुंभ – (शुभ रंग- चंदेरी)

असलेला पैसा जपून वापरा. दिवसाच्या उत्तरार्धात असा एखादा मोठा खर्च उद्भवू शकतो जो टाळता येणार नाही. काहीजण सहकुटुंब दूरच्या प्रवासाचा आनंद घेतील.

मीन – ( शुभ रंग- पांढरा)

आज तुमचा इच्छापूर्तीचा दिवस आहे. आज जे काही पदरात पडेल ते तुमच्या पात्रतेपेक्षा थोडीतरी जास्तच असेल. नवीन उद्योग सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.

श्री जयंत कुळकर्णी.

ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.

फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.