Pune : विवाहाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – विवाहाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर ( Pune ) बलात्कार करणाऱ्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यातील दोघांना अटक करण्यात आली.

वैभव शिवराम मेरगो (वय 32 , रा. कांचनवाडी, छत्रपती संभाजीनगर), प्रशांत पांडुरंग बनसोडे (वय 40, रा. टेंभुर्णी ता. माढा) आणि सुमीत वाल्मीकी (वय 25 , रा. सोलापूर) अशी आरोपींची नावे आहेत. यातील मेरगो आणि बनसोडे यांना अटक करण्यात आली. त्यांचा साथीदार वाल्मीकी पसार झाला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे.

Pune : पुणे रेल्वे स्थानक आवारातून सात महिन्यांच्या बालकाचे अपहरण

याबाबत मुलीच्या आईने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपींच्या ताब्यातून मुलीची सुटका करण्यात आली आहे. सप्टेंबर 2022 मध्ये चौदा वर्षीय मुलगी बेपत्ता झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेरगोची चॉकलेट एजन्सी आहे. बनसोडे वाहतूकदार आहे.

मेरगोने मुलीला लग्नाचे आमिष दाखवून साथीदारांच्या मदतीने तिला 18 सप्टेंबर 2022 रोजी पळवून नेले होते. मुलगी अल्पवयीन असूनही त्याने तिच्यावर अत्याचार केले. त्याचा व्हिडिओ काढून मुलीला धमकावले. आई आणि भावाचे अपहरण करून त्यांना जिवे मारण्याची धमकीही त्याने दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपींना ( Pune ) अटक केली. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक सोनाली मिठारे तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.