NCP : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लोकसभेच्या 10 जागा लढणार

एमपीसी न्यूज – महाविकास आघाडी एकजुटीने लोकसभा ( NCP) निवडणुकीला सामोरे जाणार आहे. लवकरच जागा वाटपावर शिक्कामोर्तब होईल.  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 10 जागांवरच लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

पवार म्हणाले की, बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे यांच्या  विरोधात विरोधकांकडून उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार यांचे नाव चर्चेत आल्यानंतर सुळे यांच्याबाबत सकारात्मक वातावरण सुरू झाले.  खडकवासला विधानसभा मतदारसंघात चांगली मते मिळतील. अहमदनगर, शिरूरमध्ये महाविकास आघाडीला चांगले वातावरण आहे. महाराष्ट्र पुरोगामी विचारांचे राज्य आहे. इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र वेगळे राज्य आहे. मतदार जागृत आहे. त्यामुळे भाजपचा 45 जागा जिंकण्याचा हेतू सफल होणार नाही. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला धक्का बसेल.

Today’s Horoscope 07 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

महायुती लोकसभा निवडणूक एकत्रित लढवेल. विधानसभा एकत्रित लढूच शकणार नाहीत. लढण्याची वेळ आली तर  अजित पवार यांच्या गटाला 25 पर्यंत जागा मिळतील. उर्वरित आमदारांना कमळाच्या चिन्हावर लढायला लावतील. विधानसभेला अजित पवारांसह त्यांच्यासोबतचे 10 आमदार सहज निवडून येतील.  सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह अनेकांसाठी विधानसभेची निवडणूक ( NCP) सोपी नसेल, असा दावाही त्यांनी केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.