Rohit Pawar: खडसेंना ब्लॅकमेल केलं गेलं असावं; रोहित पवार यांची भाजपवर टीका

एमपीसी न्यूज – एकनाथ खडसे यांची लवकरच भाजपमध्ये घरवापसी होणार असून रोहित(Rohit Pawar) पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. खडसेंना ब्लॅकमेल केलं गेलं असावं. खोट्या फाईल काढून जसं केजरीवालांना आत टाकलं तस त्यांचा प्लॅन असेल, अशी टीका रोहित पवार यांनी भाजपवर केली आहे.

रोहित पवार म्हणाले की, मी खडसे बद्दल बोलणार नाही. त्यांच्या अडचणी खूप (Rohit Pawar)आहेत. भाजप खोट्या फाईल काढून त्यांच्यावर कारवाई करू शकतं. खडसे साहेबांची तब्येत खूप खराब आहे.

Bhosari : भोसरीतून साडेचार लाखांचा गुटखा जप्त

अशा तब्येतीत त्यांना भाजप जेलमध्ये देखील टाकू शकते. भाजपने असे खोटे आरोप करून अनेक नेत्यांची ताकद कमी केली आहे. नेत्यांना भीती दाखवली जात आहे. खडसेंना ब्लॅकमेल केलं गेलं असावं. खोट्या फाईल काढून जसं केजरीवालांना आत टाकलं तस त्यांचा प्लॅन असेल, असा आरोप त्यांनी भाजपवर केला आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.