Pune : भारतीय जनता पार्टीने स्मार्ट पुण्याचे स्वप्न दाखवत संपूर्ण पुणे शहराची वाट लावली – रवींद्र धंगेकर

महाविकास आघाडीने केले पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन

एमपीसी न्यूज – बीजेपीने स्मार्ट पुण्याचे स्वप्न दाखवत संपूर्ण पुणे शहराची वाट लावली. पुणेकरांना आता बदल हवा असून सर्वसामान्य पुणेकरांच्या नागरी व सामजिक समस्या सोडविण्यासाठी जनतेत मिसळणारा उमेदवार  (Pune) म्हणून मला पुणेकर नक्कीच निवडून देतील, असा विश्वास महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे पुणे लोकसभा मतदार संघातील काँग्रेस उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केला.

ॲड. रामचंद्र उर्फ चंदू कदम यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन  रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये (Pune) केले त्यात ते बोलत होते.

Supreme court : लखन भैय्या एन्काऊंटर प्रकरणात दोषी आढळलेल्या प्रदीप शर्मा यांच्या जन्मठेपेच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

या प्रसंगी  महारष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी म्हणाले की, काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीनाम्यात पाच न्याय व पंचवीस गॅरंटी अंमलात आणण्याचे वचन दिले आहे. सर्व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचा हा लोकाभिमुख जाहीरनामा जनतेपर्यंत  पोहोचवला पाहिजे.  या प्रसंगी माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे म्हणाले की, देशाचे संविधान धोक्यात असून संविधान टिकले तरच या देशातील लोकशाही टिकेल त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुणेकरांच्या घरोघरी जाऊन काँग्रेस पक्षाची संविधान रक्षणाची भूमिका सांगावी.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, महाविकास आघाडी व इंडिया फ्रंट पूर्ण ताकदीने व एकदिलाने या निवडणुकीत उतरली असून सामान्य जनतेसाठी धावून जाणारा माणूस म्हणून धंगेकर यांना पुणेकर नक्कीच भरभरून मतदान करतील.पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, भाजपने पुणे मनपाच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीत प्रचंड भ्रष्टाचार केला असून या निवडणुकीत पुणेकर भाजपला घरी बसवल्या शिवाय राहणार नाहीत.

काँग्रेसचे  जेष्ठ नगरसेवक चंदू कदम म्हणाले की, ही लढाई जनशक्ती विरुध्द धनशक्ती अशी असून यावेळेस कोथरूडकर मतदार धंगेकर यांच्या पारड्यात किमान एक लाख मते टाकतील.आशिष गार्डन येथे घेण्यात आलेल्या या मेळाव्याला मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिकृत उमेदवार असलेले रवींद्र धंगेकर हे सर्वसामान्य कुटुंबातून येतात म्हणून ही निवडणूक  ‘एक नोट व एक व्होट‘ देऊन नागरिकांनी आपल्या हाती घ्यावीअसे आवाहन मेळाव्याचे आयोजक ॲड. रामचंद्र उर्फ चंदू कदम यांनी केले. त्यांच्या या आवाहनाला कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि तब्बल ४२,७०० रुपये लोक वर्गणी गोळा झाली.

यावेळी माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे व गजानन थरकुडे, आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे व धनंजय बेनकर, पृथ्वीराज सुतार,योगेश मोकाटे,  लक्ष्मी दुधाणे, शिवसेना उपशहरप्रमुख राजेश पळसकर, राष्ट्रवादी ब्लॉक अध्यक्ष स्वप्नील दुधाणे, राष्ट्रवादी ब्लॉक उपाध्यक्ष गिरीश गुरुजानी, आम आदमी पार्टी ब्लॉक अध्यक्ष ॲड. अमोल काळे, प्रा. पवार सर उपस्थित होते.

तसेच, शिवसेनेचे नितीन पवार, पुणे शहर युवक काँग्रेस सरचिटणीस सागर सुबराव कदम, आम आदमी पार्टी महाराष्ट्र सचिव डॉ. अभिजित मोरे , महाराष्ट्र घरेलू कामगार अध्यक्ष सुनिल शिंदे, महिला ब्लॉक काँग्रेस अध्यक्षा मनीषा करपे, पुणे शहर महिला काँग्रेस सरचिटणीस नायना सोनार, पुणे शहर एन एस यु आय अध्यक्ष अभिजित गोरे, शिवा मंत्री, विजय खळदकर (उपाध्यक्ष), राजीव गांधी पंचायत शहर अध्यक्ष किशोर मारणे उपस्थित होते.

 

कोथरूड ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रवींद्र माझिरे यांनी प्रास्ताविक केले, यशराज पारखी यांनी आभार व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.