Hinjawadi : आई सापडलीच नाही; बिबट्याच्या ‘त्या’ पिलाची रेस्क्यू सेंटर मध्ये रवानगी

एमपीसी न्यूज – हिंजवडी जवळ नेरे गावात ऊस तोडणी सुरु असताना (Hinjawadi)सापडलेल्या बिबट्याच्या नवजात पिलाला अखेर रेस्क्यू सेंटरमध्ये पाठवण्यात आले. 30 मार्च रोजी हे पिल्लू सापडले होते. आठवडा उलटून देखील त्याला न्यायला त्याची आई न आल्याने त्याची रवानगी रेस्क्यू सेंटर मध्ये करण्यात आली आहे. 
नेरे गावातील राहुल जाधव यांच्या शेतात ऊस तोडणी सुरु असताना (Hinjawadi)एका मजुराला बिबट्याचे नवजात पिल्लू आढळले. ही माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या अधिकारी, कर्मचारी, प्राणी बचाव पथक, वन्यजीव संरक्षण स्वयंसेवक यांच्या पथकांनी नेरे गावात धाव घेतली.
अवघ्या काही दिवसांचे हे पिल्लू असल्याने त्याला आईची गरज होती. त्यामुळे त्याला नैसर्गिक अधिवासात ठेवणे गरजेचे होते. जाधव यांच्या शेताच्या बाजूला सुरक्षित ठिकाणी बिबट्याचे पिल्लू ठेवण्यात आले. जिथे त्याची आई येऊन त्याला घेऊन जाईल, अशी सर्व परिस्थिती निर्माण करण्यात आली. मात्र एक आठवड्याचा कालावधी उलटून गेला तरी मादी बिबट आली नाही.
लहान पिल्लाची काळजी घेणे गरजेचे असल्याने त्याला रेस्क्यू सेंटर मध्ये पाठवण्यात आले. रेस्क्यू सेंटर मध्ये लहान पिलांना सांभाळण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी असतात. तिथे त्याची व्यवस्थित काळजी घेतली जाणार आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.