Pune : पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीची गळफास घेऊनआत्महत्या

एमपीसी न्यूज – पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीने (Pune)आत्महत्या केली आहे. हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन तरुणीने आत्महत्या केली. पुण्यातील गुरुवार पेठेत धक्कादायक घटना घडली आहे.

अभिलाषा मित्तल असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची (Pune)प्रक्रिया सुरू आहे.

Pune : भारतीय जनता पार्टीने स्मार्ट पुण्याचे स्वप्न दाखवत संपूर्ण पुणे शहराची वाट लावली – रवींद्र धंगेकर

प्राथमिक माहितीनुसार, अभिलाषा मित्तल (27) मूळची वाशिमची जिल्ह्याची असून गेल्या काही महिन्यांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी ती पुण्यात वास्तव्यास होती. पुण्यातील गुरुवार पेठेत एका हॉस्टेलमध्ये काही मैत्रिणींसोबत ती राहत होती. अभिलाषा ने तिच्या खोलीचा दरवाजा बंद करून गळफास लावून आत्महत्या केली. मैत्रिणींनी दरवाजा उघडण्यासाठी प्रयत्न केला असता. आत मधून कुठलाच आवाज येत नसल्याने मैत्रिणींनी रूमची खिडकी उघडली तर अभिलाषाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं निदर्शनास आलं

या तरुणीच्या अंगावर मारणीच्या खुणा असल्याचं प्राथमिक तपासात समोर आल्याने ही हत्या आहे का आत्महत्या याचा देखील तपास पोलिसांकडून सुरू आहे

पोलिसांकडून नातेवाईकांची आणि इतर मैत्रिणींची चौकशी सुरू आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.