Supreme court : लखन भैय्या एन्काऊंटर प्रकरणात दोषी आढळलेल्या प्रदीप शर्मा यांच्या जन्मठेपेच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

एमपीसी न्यूज : लखन भैय्या एन्काऊंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने जन्मेठेपेची शिक्षा सुनावलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने आज स्थगिती दिली. एन्काऊंटर  स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात मुंबई उच्च न्यायालयाने सुनावलेल्या  जन्मठेपेच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेत घेतली होती.

Pune : दोन देशांतील संबंध दृढ करण्यासाठी विद्यार्थी आदान-प्रदान कार्यक्रम महत्त्वाचा – डॉ. शरद कुंटे

 

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, लखन भैय्या  बनावट  एन्काऊंटर प्रकरण हे 2006 साली घडलेले होते. ह्या बनावट एन्काऊंटर प्रकरणात 2013 मध्ये मुंबई सत्र न्यायालयाने दोषमुक्त केले होते. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने लखन भैय्या एन्काऊंटर प्रकरणासंबंधीत अनेक याचिकांवर  सुनावणी घेत सत्र न्यायालयाचा निर्णय रद्दबातल केला आणि प्रदीप शर्मा यांना  जन्मठेपेची शिक्षा देण्याचा निर्णय 20 मार्चला  दिला होता. या निकालाला आव्हान देणारी याचिका प्रदीप शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme court) केली असता सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी  4 आठवड्यांसाठी  तहकूब केली. त्यामुळे प्रदीप शर्मा यांना दिलासा मिळाला आहे.

ह्या प्रकरणावर पुढील तपासणी  (Supreme court)  ४ आठवड्यानंतर सुरु करण्यात येईल असे सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले असून राज्य सरकारला  या संदर्भातील  उत्तर सर्वोच्च न्यायालयाकडे मांडावे लागणार आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.