Pradeep Sharma : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा ससून रुग्णालयात दाखल 

एमपीसी न्यूज – एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.येरवडा कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली आहे.मनसुख हिरेन हत्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान शर्मा यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. येरवडा कारागृहात असताना त्यांच्या पोटात दुखत असल्याने त्यांना ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.पंधरा दिवसांपूर्वी त्यांच्या पोटात दुखत असल्याने सोनोग्राफी करण्यासाठी आणि पुढील उपचारासाठी त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

काही महिन्यांपूर्वी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटीलिया इमारतीच्या बाहेर स्फोटक असलेली कार सापडली होती.या प्रकरणात आणि मनसुखिरेन हत्या प्रकरणात प्रदीप शर्मा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती.सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

प्रदीप शर्मा हे मुंबई पोलीस दलात होते.एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी त्यांची ओळख आहे. आतापर्यंत त्यांच्या नावावर शंभरहून अधिक एन्काऊंटरची नोंद आहे.2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती.नालासोपारा इथून ते उभे होते. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.